आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Loot Rs 3 Cr Gold: In A Shocking Robbery In Mumbai

मुंबई: विलेपार्लेत फिल्मी पद्धतीने भरदिवसा 3 कोटींचे सोने लुटले!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईत आज सकाळी 11 च्या सुमारास चित्रपटात शोभेल अशा फिल्मी पद्धतीने 3 कोटींचे सोने लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. हे सोने मुंबईतील एका सराफाने हैदराबाद, चेन्नईहून मागवले होते.

आज सकाळी मागवलेले सोने एक कुरिअर बॉय विले पार्ले हायवेवरून घेऊन जात होता. त्यावेळी सोने लुटण्याचे उद्देशाने पाच-सहा जण आले. त्यांनी कुरिअर बॉयची गाडी अडवून पोलिस असल्याचे सांगितले. आम्ही पोलिस असून, आम्हाला तुझी तपासणी करायची आहे असे सांगितले. तसेच त्याच्याकडे असलेली सोन्याची बॅग ताब्यात घेतली. त्यानंतर तू आमच्यासोबत पोलिस ठाण्यात चल म्हणून कुरिअर बॉयला सांगितले.
दोघे जण त्याच्या गाडीवर बसले व बाकीचे इतर वाहनांनी येतो असे सांगून पुढे जाण्यास सांगितले. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर आलेल्या एका वाहनांत बसून ते दोन भामटेसह सोन्याच्या बॅगसह पसार झाले. त्यानंतर कुरिअर बॉयने घडलेली घटना मालकाला कळविली. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी अज्ञात 5 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात यश आले नाही.