आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्ट्र: प्रेमविवाह केल्याने मुलीच्या दशक्रियेचा वडिलांकडून \'कार्यक्रम\'!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडिल अविनाश तोरवणे यांनी मुलगी निकिता (मराठे) संबंधी लावलेले होर्डिंग... - Divya Marathi
वडिल अविनाश तोरवणे यांनी मुलगी निकिता (मराठे) संबंधी लावलेले होर्डिंग...
मुंबई- आपल्या 19 वर्षीय मुलीने प्रेमविवाह केल्याने वडिलांचा संताप अनावर झाला. या संतापातून व रागातून बाहेर येण्यासाठी मुलीच्या पित्याने गावात चक्क जाहीर होर्डिंग लावले व निमंत्रणही दिले. ही घटना आहे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कासारे गावातील.

कासारे गावातील अविनाश तोरवणे यांच्या मुलीने प्रेमविवाह केल्याने समाजात बदनामी झाल्याची भावना वडिलांची झाली. त्यामुळे ती मेल्याचे जाहीर करण्याचे ठरविले. यासाठी त्यांनी होर्डिंग बनवून गावाच्या वेशीवर चिकटवले व सर्व ग्रामस्थांना निमंत्रण दिले. त्या होर्डिंगमध्ये कळविण्यास आनंद होतो की निकीता तोरवणे (मराठे) हिचे वयाच्या 19 व्या वर्षी 14 जुलै 2015 रोजी दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी दुखद निधन झाले. तिचा दशक्रिया विधी 19 जुलै 2015 रोजी रविवारी करण्याचे आहे तरी कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे त्यात म्हटले आहे. दरम्यान, ही बाब गावात वा-यावर पसरली. त्यानंतर ती फेसबुक व व्हॉटसअॅपवरून सोशल मिडियात होर्डिंगचे फोटो व्हायरल झाले. गावातील जागरूक नागरिक व पोलिसांमुळे पुढील अनर्थ टळला.
अविनाश तोरवणे हे पेशाने शिक्षक आहेत. त्यांची मुलगी निकिता हिनेही या घटनेनंतर वडिलांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनीही याप्रकरणात सहभाग घेतला व वडिलांचा डाव हाणून पाडला. पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेतल्यानंतर रागाच्या भरात आपण हे कृत्य केल्याचे सांगितले. तसेच माफीही मागितली. ग्रामस्थांनीही पोलिसांनी विनंती करीत हे प्रकरण अधिक न ताणण्याची विनंती केली. अखेर वडिलांनी सपशेल माफी मागून हे प्रकरण थांबवले.
पुढे आणखी वाचा... वाचा कराडमध्ये झालेल्या गोळीबारात एक ठार, गोळी झाडणाऱ्याला ठेचून मारले....औरंगाबादमध्ये घाटीच्या डॉक्टरांना रुग्णाच्या नातलगांची मारहाण
बातम्या आणखी आहेत...