आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवर व्हायरल झाली कॅन्सर पीडिताची लव्ह स्टोरी; पत्नीने मृत्युला पाठवले माघारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मनोज गोयलला विवाहानंतर अवघ्या पाच महिन्यांत ब्लड कॅन्सरने ग्रासले होते. इतकेच नाही तर, मनोज थोड्या दिवसांचा सोबती असल्याचे डॉक्टरांनी सांगून टाकले होते. तब्बल 20 दिवस कोमात राहून त्याने पत्नीच्या खंबीर पाठबळाच्या जोराव कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर मात केली.

'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे' या फेसबुक पेजवर मनोज गोयल आणि मानसी मटालिया यांच्या  संघर्षाची कहाणी व्हायरल झाली आहे. आतापर्यंत 16000 यूजर्सनी या पेजला लाइक केले आहे. तसेच 1500 वेळा मनोज आणि मानसीची स्टोरी शेअर झाली आहे.

अशी झाली मनोज-मानसीची भेट...
'फेसबुक पेज'वर मनोजने त्याची लव्ह स्टोरी शेअर केली आहे. मित्राच्या पार्टीत त्याची मानसीसोबत पहिली भेट झाली होती. नंतर दोघे व्हॉट्सअॅप ग्रुपवर चॅट करू लागले. 
- काही दिवसांतच दोघे एकमेकांमध्ये हरवले. नंतर दोघे विवाहाच्या बंधनात अडकले. 

मनोज तापाने फणफणला...
- विवाहानंतर अवघ्या पाच महिन्यांत मनोज तापाने फणफणला. त्याला डॉक्टरांनी ब्लड टेस्ट करण्याचा सल्ला दिला. 
- मनोजला ब्लड कॅन्सर झाला असल्याचे डॉक्टरांनी निदान केले. हे ऐकून मानसीला मोठा धक्का बसला. पण ती थोडीही डगमगली नाही. 
- मनोजच्या मागे ती खंबीरपणे उभी राहिली.

उपचार सुरु झाले तेव्हा कॅन्सर दुसर्‍या स्टेजवर होता...
- मनोजवर उपचार सुरु झाले तेव्हा कॅन्सर दुसर्‍या स्टेजवर पोहोचला होता. त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या होत्या. तसेच लिव्हर देखील काम करत नव्हते. 
- मनोजवर मोठी शस्त्रक्रिया करण्‍यात आली. नंतर तो 20 दिवस कोमात गेला. मनोज 24 तासांचा सोबती असल्याचे त्यांनी सांगून टाकले होते. डॉक्टरांनी व्हेंटीलेटर काढण्याचा सल्ला दिला होता. 
- मात्र, मानसीने डॉक्टरांनी स्पष्‍ट नकार दिला.
- 20 दिवसांनी मनोज शुद्धीवर आला तेव्हा त्याच्या शरीरावर 7 मशिनी बसवलेल्या होत्या. 
- मानसी माझ्यासोबत होती. पुढील 50 दिवस ती मनोजसाठी खंबीरपणे उभी राहिली.

मेंदूपर्यंत पोहोचला होता कॅन्सर...
- मनोजचा कॅन्सर मेंदूपर्यंत पोहोचला होता. तब्बल 6 महिने तो पलंगाला खिळून होता. या काळात मानसीची त्याला उत्तम साथ लाभली. वेगवेगळे व्हिडिओ दाखवून ती मनोजला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होती.  
- रात्री उशीरापर्यंत त्याचे फोन कॉल्स अटेंड करत होती. या काळात अनेकदा मनोजला कीमो थेरपीचा सामना केला. 
- अखेर मानसीच्या अथक परिश्रमांनी मनोजच्या मृत्यूला माघारी परतण्यासाठी मजबूर केले. 
- मनोज आज सुखरुप आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, मनोज आणि मानसीचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...