आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिता जिनांच्या विरोधानंतरही दिना वाडियांनी केले होते आंतरधर्मीय लग्न, अशी आहे लव्हस्टोरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिना आणि त्‍यांची मुलगी दिना. - Divya Marathi
जिना आणि त्‍यांची मुलगी दिना.
मुंबई- पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिना यांची एकुलती एक कन्या दिना वाडिया (वय-98) यांचे गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा नस्ली वाडिया आणि मुलगी डायना आहे. परधर्मियाशी लग्न केल्याने वडिल मोहम्मद अली जिना यांनी दिनासोबतचे सर्व संबंध तोडले होते. जिना यांनी मुंबईतील रतनबाई ऊर्फ रती या पारशी तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. या दाम्‍पत्‍याला दिना नावाची एक मुलगी झाली. मात्र, दिना यांनीही जिना यांचा प्रखर विरोध झुगारून मुंबईतील नेवील वाडिया या उद्योगपतीसोबत प्रेमविवाह केला. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे, जिना यांची एकुलती एक मुलगी असलेल्या दिना यांच्या प्रेमकहाणीबद्दल...
 
वडिलांचा विरोध झुगारून दिना यांनी केला होता प्रेमविवाह-
 
- जिना यांनी वयाच्या 42 व्या वर्षी मुंबईतील रतनबाई ऊर्फ रती या 16 वर्षीय पारशी तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता.
- या दाम्‍पत्‍याला दिना नावाची एक मुलगी झाली. पुढे रती यांचा मृत्यू वयाच्या 29 व्या वर्षी मृत्यू झाला. 
- यानंतर दिना यांचा संभाळ त्यांची आजी म्हणजेच रतीची आई दिनबाई पिटिट यांनी केला.
- मात्र, दिना यांचे बालपण पारशी कुटुंबात गेले. दिना यांचे लहानपण हे अत्यंत चांगल्या वातावरणात गेले. 
- पुढे दिना यांनी पारशी समुदायातील नेवील वाडिया यांच्याशी प्रेमविवाह केला. जो जिना यांना मंजूर नव्हता. 
- मात्र, दिना यांनी आपल्या पित्याला ठणकावून सांगितले की, तुम्ही आपल्या मुलीच्या वयाच्या आणि परधर्मातील मुलीशी विवाह कसा केला होता? 
- अखेर दिना यांनी जिना यांचा प्रखर विरोध झुगारून मुंबईतील नेवील वाडिया या उद्योगपतीसोबत प्रेमविवाह केला. 
- दिना यांच्या या भूमिकेनंतर जिना यांनी मुलीसोबतचे सर्व संबंध तोडले. रतीच्या मृत्यूनंतर मोहम्मद अली जिना हे अधिक धार्मिक व परंपरावादी बनले. 
- यामागे त्यांचा राजकीय स्वार्थ होता. कारण त्याच काळात त्यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली आणि पुढे पाकिस्तान देश जन्माला घातला.

पुढील स्‍लाईडवर वाचा, कधी सुरू झाली दिना आणि नेवील यांची प्रेमकहाणी...
जिना म्‍हणाले- तू माझी मुलगी असूच शकत नाही.... 
दिनांचे नंतरही होते पाकिस्‍तानात येणे-जाणे... 
जिनाचे वंशज आता आहेत भारतीय... 
दिना जिनांना म्‍हणायच्‍या 'पापा डार्लिंग'...
बातम्या आणखी आहेत...