आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुभाषचंद्र बोस यांची लव्‍ह स्टोरी; ऑस्ट्रियातील टायपिस्टवर जडला होता जीव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगी अनीतासोबत एमिली.  बाजूला नेताजी. - Divya Marathi
मुलगी अनीतासोबत एमिली. बाजूला नेताजी.
मुंबई- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्‍या मृत्‍यूसंबंधी 64 फाइलमधील माहिती बंगाल सरकार आज (शुक्रवार) सार्वजनिक करणार आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे नेताजींच्‍या लव्‍ह स्‍टोरी बद्दल. सुभाषचंद्र बोस आणि एमिली यांचे प्रेम आणि त्‍यांच्‍या लग्‍नापर्यंतचा हा खास प्रवास....
ऑस्ट्रियात झाली पहिली भेट
वर्ष 1934 मध्‍ये नेताजी उपचारासाठी ऑस्ट्रिया येथे गेले होते. त्‍या ठिकाणी त्‍यांना बरेच दिवस राहावे लागणार असल्‍याने फावल्‍या वेळात आपण आपले आत्‍मचरित्र लिहावे, असे त्‍यांना वाटले. त्‍यांनी आपला विचार एका मित्राला सांगितला आणि त्‍यासाठी एक टंकलेखक (टायपिस्ट) शोधण्‍याची जबाबदारीही सोपवली. त्‍याच्‍या माधूनच त्‍यांनी या कामासाठी एमिली या युवतीची नियुक्‍ती केली. नेताजी एमिली यांना आपली आत्‍मकथा डिक्टेट करत असत. दरम्‍यान, दोघेही एकमेकांच्‍या प्रेमात पडले. 1937 मध्‍ये त्‍यांनी गुप्‍तपणे लग्‍नही केले. या दाम्‍पत्‍याला 21 नाव्‍हेंबर 1942 रोजी व्हिएन्ना येथे एक मुलगी झाली. त्‍यांनी तिचे नाव अनीता ठेवले.

एमिली शेंकलला करावी लागली पोस्‍टात नौकरी
नेताजी यांनी एमि‍ली सोबत पहिल्‍यांदा गुप्‍तपणे लग्‍न केले. नंतर फेब्रुवारी 1942 मध्ये त्‍यांनी पुन्‍हा हिंदू पद्धतीने लग्‍न केले. 8 फेब्रुवारी 1943 रोजी पाणबुडीत बसताना सुभाषचंद्रांनी एमिलीचा निरोप घेतला ती त्या दोघांमधील अखेरची भेट. पुढे अनीताला घेऊन आपल्‍या कुटुंबाचा गाडा हाकण्‍यासाठी एमिली यांना पोस्‍टात नौकरी करावी लागली. अनीता यांच्‍या माहितीनुसार, आपल्‍या आईने नेताजी यांच्‍यासोबत असलेल्‍या नात्‍याला कधी सार्वजनिक केले नाही. आपला पती कोण आहे, हे गुप्‍त ठेवून तिने या जगाचा निरोप घेतला. आईने सांगितले होते, रोजच्‍या प्रमाणे ती सायंकाळी रेडिओवर बातम्‍या ऐकत होती. 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातानंतर सुभाषचंद्रांचा शेवट झाल्‍याचे तिला कळाले. त्यानंतर 1995 मध्‍ये तिचे निधन झाले.
पुढील स्‍लाइडवर वाचा दोघे पाठवायचे एकमेकांना पत्र....