आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lover Died In Road Accident In Mumbai After Knifed Girl

अल्पवयीन मुलीवर चाकूहल्ला करून पळणारा गाडीखाली चिरडून ठार, मुंबईतील घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एकतर्फी प्रेमातून 17 वर्षीय तरुणीवर चाकूने हल्ला करून पळणारा 23 वर्षीय तरुण घटनेच्या काही मिनिटांनंतर अपघातात ठार झाल्याची घटना मुंबईत घडली आहे. तर हल्ला करण्यात आलेली तरुणी सध्या रुग्णालयात आईसीयूमध्ये जीवन मृत्यूसाठी झगडत आहे.
पीडितेचा दूरचा नातेवाईक अनिल दांडेकर मुंबईत रिक्षा चालवत होता. अनाथ असल्यामुळे तो बोरीवलीच्या कंजुपाडा येथे चुलत भावांसोबत राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता आणि या मुलामध्ये गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र कुटुंबीयांनी त्याला नकार दिला आहे. अनिलचे मुलीवर एकतर्फी प्रेम होते, असे त्यांचे म्हणणे आहे.

गोरेगाव कॉलेजमध्ये 12 वीमध्ये शिकणारी पीडिता सोमवारी शिकवणीला जाण्यासाठी सायंकाळी पाचच्या दरम्यान घरातून निघाली होती. सात वाजता घरी परतत असताना अनिल तिची वाट पाहत रस्त्यात थांबला होता. त्याने तिला घरी सोबत येण्याचा आग्रह करत रिक्षामध्ये बसवले. दोघांमध्ये काही वेळ वाद झाल्यानंतर वाद अधिक वाढला. आणि सुमारे नऊ वाजता त्याने रिक्षा थांबवली त्यानंतर त्याने चाकू काढला आणि त्याने तरुणीवर वार केले.

अनिलने तरुणीच्या जबड्यावर आणि गळ्यावरही वार केले. सुमारे तीन ते चार वार झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रक्तप्रवाह सुरू झाल्याने तो घाबरला. त्यामुळे त्याने त्या ठिकाणाहून पळ काढला. रसत्याच्या दुस-या बाजुला येताच येणा-या एका गाडीने त्याला चिरडले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. साडे नऊच्या सुमारास एका अॅम्ब्युलन्समधून जाताना ड्रायव्हरने त्याला पाहिले. त्यानंतर त्यानेच जवळ जखमी अवस्थेत पडलेल्या मुलीलाही रुग्णालयात पोहोचवले. पीडितेच्या बहिणीचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यामुळेच अनिल चाकू घेऊन आला होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.