आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lover Rape On Minor Girlfriend At Ray Road Mumbai

अल्पवयीन प्रेयसीवर बलात्कार,फिनेल पाजून ठार मारण्याचा प्रयत्न, प्रियकर अटकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील रे रोड येथे प्रियकरानेच आपल्या अल्पवयीन प्रेयसीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन कुटुंबांत झालेल्या भांडणाच्या रागातून ही घटना घडल्याचे पुढे आले आहे. प्रियकर एवढ्यावरच थांबला नाही तर भावाच्या मदतीने प्रेयसीला फिनेल पाजून ठार मारण्याचाही प्रयत्न केला. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी प्रियकर तरबेझ शेख आणि त्याचा भाऊ नासिर शेख यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
रे रोड येथील झोपडपट्टीमध्ये राहणार्‍या एका 17 वर्षीय तरुणीबरोबर तरबेझ याचे काही वर्षापासून प्रेमसंबंध होते. एकमेकांपासून जवळच राहणार्‍या या दोन कुटुंबांमध्ये काही दिवसांपूर्वी भांडण झाले. या भांडणाचा राग काढण्यासाठी मुलीचे पालक अजमेर शरीफला गेले असताना घरात जाऊन तिच्यावर बलात्कार केला. इतकेच नाही तर तरबेझ याने भावाच्या मदतीने फिनेल पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या मुलीने तक्रारीत केल्याचे शिवडी पोलिसांनी सांगितले. या मुलीला उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले.