आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात कमी पाऊस; सरकार घेईल काळजी, कृषी राज्यमंत्री खोत यांचे अाश्वासन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठवाड्यात अातापर्यंत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला असून अाॅगस्टमध्ये केवळ ५ टक्केच पाऊस झाल्यामुळे त्याचा परिणाम पिकांवर हाेण्याची शक्यता अाहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून याेग्य ती काळजी अाणि उपाययाेजना केली जाणार असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खाेत यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली.   

सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा, शेतमालाचे पडलेले भाव अाणि दुष्काळाच्या छायेमुळे मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झाले अाहेत. यासंदर्भात उपाययाेजना करण्याच्या दृष्टीने अमरसिंह पंडित यांनी नियम ९७ नुसार अल्पकालीन चर्चा उपस्थित केली हाेती.  यावर  उत्तर देताना खाेत म्हणाले, अत्यल्प पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल. मराठवाड्यातील  ६० लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असल्याचे त्यांनी सांगितले. 

जलसंपदा मंत्री राम शिंदे म्हणाले, अाैरंगाबाद येथे मराठवाड्याचे अायुक्तालय प्रस्तावित अाहे. हे अायुक्तालय सुरू झाल्यावर मराठवाड्याला दरवर्षी एक हजार काेटी रुपयांचा अावश्यक ताे निधी उपलब्ध हाेऊ शकताे. 
बातम्या आणखी आहेत...