आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालघर: एकाच कुटुंबातील 10 जणांचा अपघातात मृत्यू, 20 जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालघर- मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मिनी बस आणि लक्झरी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 10 जण एकाच कुटुंबातील आहेत. तर या अपघातात 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना तलासरी, वापी आणि सेलवासमधील रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
पालघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील पालघर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील आच्छाड येथील सीमा हॉटेलजवळ पहाटे साडेचारच्या सुमारास मिनी बस व लक्झरी बस यांच्यात समोरासमोर धडक झाली. धडक एवढी भीषण होती की मिनीबस चक्काचूर झाली. लक्झरी बस अहमदाबादहून मुंबईकडे येत होती तर मिनी बस मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात होती. मृतांत मिनी बसला लोकांचा समावेश आहे. तसेच मृत लोक एकाच कुटुंबातील असल्याचे समोर येत आहे.
बातम्या आणखी आहेत...