आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मुंबईत 250 कोटींच्या बंगल्यात राहाते राधे माँ, पार्किंगमध्ये लक्झरी कारचा ताफा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कायम वादग्रस्त राहाणारी राधे माँ उर्फ सुखविंदर कौर एका नव्या वादामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. कधीकाळी राधे माँचा अत्यंत जवळचा म्हणून ओळखला जाणारा व्यावसायिक मनमोहन गुप्ताने तिच्या विरोधात बोरीवली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. गुप्ताचा आरोप आहे की राधे माँने त्याच्या पत्नीला धमकावले आहे. या भौतिक मोह-मायेच्या जंजाळात मला आडकायचे नाही, असे सांगणाऱ्या राधे माँची कशी आहे लाइफ स्टाइल हे divyamarathi.com सांगत आहे.

250 कोटींच्या बंगल्यात राहाते राधे माँ

राधे माँकडे अनेक लक्झरी कार
- राधे माँचा मुंबईतील चिकूवाडी येथे आलिशान बंगला आहे. उंची मार्बल्स आणि फ्लोरिंग असलेल्या या बंगल्याची किंमत अंदाजे 250 कोटी रुपयांपर्यंत आहे.
- ज्या रुममध्ये राधे माँ आपल्या भक्तांना भेट देते तिथे मखमली बिछायत आहे. एसी, फॅन्सी लायटिंगसह अनेक लक्झरी सुविधा आहेत.
- राधे माँच्या ताफ्यात मर्सिडीज, होंडा सिटी, फॉर्च्यूनर, जॅग्वारसह अनेक लक्झरी कार आहेत.
- गेल्या काही महिन्यातील वादांमुळे राधे माँकडे येणाऱ्या भक्तांमध्ये कमी झाली आहे तर तिचे फिरणेही बऱ्यापैकी कमी झाले आहे. यामुळे तिच्या ताफ्यातील कार सत्संगांच्या जागेत पार्क करण्यात आल्या आहेत.
- राधे माँचे म्हणणे आहे की ती तिच्या भक्ताच्या घरात राहाते. मात्र तिच्यावर एक कोटींची संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे.
पुढील स्लाइडमध्ये फोटोतून पाहा, राधे माँच्या लक्झरी लाइफस्टाइल
> इन्फोग्राफिक्समधून समजून घ्या कोण आहे राधे माँ..
बातम्या आणखी आहेत...