आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • M. S. Dhoni: The Untold Story Latest News In Hindi

\'धोनी\'च्या चित्रपटात असेल त्याच्या एक्स गर्लफ्रेंडची कहाणी, जी नाहीये या जगात!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रीडा डेस्क- टीम इंडियाचा कर्णधार धोनीच्या आत्मचरित्रावर आधारित तयार होणा-या 'एम. एस. धोनीः द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटात त्याच्या एक्स गर्लफ्रेंडची कहानी असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनीवरील चित्रपटात त्याची माजी प्रेयसी आणि साक्षी धोनी या दोघींच्याही भेटीची कहानी असणार आहे. चित्रपटात एक्स-गर्लफ्रेंडशी संबंधित एका घटनेचा उल्लेख असणार आहे जी धोनीला सोडून गेली होती व धोनीने क्रिकेटमध्ये नाव कमावल्यानंतर त्याच्याकडे येऊ इच्छित होती. मात्र, मी माझ्या आयुष्यात आता खूप पुढे गेलो आहे असे सांगून धोनीने तिला साफ नाकारले होते. धोनीची ती माजी प्रेयसी आता या जगात नाहीये.
फवाद खान विराटच्या रोलमध्ये-
नीरज पांडे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटात धोनीने आपल्या एक्स-गर्लफ्रेंडची कहानी दाखविण्याबाबत होकार कळविला आहे. चित्रपटात धोनीचा रोल सुशांत सिंह राजपूत निभवताना दिसेल तर फवाद खानचीही प्रमुख भूमिका असणार आहे. फवाद खान हा विराट कोहलीच्या रोलमध्ये दिसेल. दरम्यान, चित्रपट निर्मात्यांनी याबाबत अधिकृतपणे माहिती देण्यास नकार दिला आहे.
अनुष्का शर्मा होणार विराटची गर्लफ्रेंड-
सूत्रांवर विश्वास ठेवला तर बोलले जात आहे की, अभिनेत्री अनुष्का शर्मा फिल्ममध्ये विराट कोहलीची गर्लफ्रेंड दाखविण्यात येणार आहे. आपल्याला माहित असेलच की ख-याखु-या आयुष्यातही अनुष्का विराटची गर्लफ्रेंड आहेत. फिल्ममधील कलाकारांबाबत माहिती दिली जात नसली तरी या चित्रपटात जॉन अब्राहम, आलिया भट्ट, गौतम गुलाटी यांच्यासह अनेक कलाकार दिसून येतील. या फिल्मचे शूटिंग ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, चेन्नई, मुंबई, दिल्ली यासारख्या ठिकाणी होईल मात्र चित्रपटातील बहुतेक शुटिंग धोनीचे शहर रांची येथे होईल. 'एम. एस. धोनीः द अनटोल्ड स्टोरी' या वर्षी ऑक्टोबरमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.
पुढे स्लाईडच्या माध्यमातून कोणता स्टार कोणत्या क्रिकेटरची भूमिका बजावेल....