आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- राज्यभरात शंभरच्या वर कोचिंग क्लासेसच्या शाखा असणार्या प्रा. मच्छिंद्र चाटे यांनी बहुजन समाज पार्टीत प्रवेश केला आहे. मूळचे बीडचे आणि वंजारी समाजाचे असलेले चाटे हे बसपातर्फे बीडमधूनच लोकसभेचे उमेदवार असतील असे संकेत पक्षातर्फे देण्यात आले आहेत.
चेंबूर येथे बहुजन समाज पार्टी भवन या मुख्यालयात प्राध्यापक मच्छिंद्र चाटे यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह बहुजन समाज पार्टीत प्रवेश केला. बसपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विलास गरुड यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी बोलताना प्रा. चाटेंनी पक्ष आपल्याला जी जबाबदारी सोपवेल ती पार पाडणार असल्याचे सांगितले आहे. लोकसभेची आगामी निवडणूक लढवणार का? या प्रश्नाला थेट उत्तर देणे त्यांनी टाळले, तरीही बीडमधून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक असून तशी चर्चाही पक्ष नेत्यांबरोबर झाली असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. आपली सामाजिक व्यवस्था ही समतेवर आधारित असली पाहिजे. त्या दिशेने वाटचाल करणारा एक मोठा पक्ष म्हणून आपण बहुजन समाज पार्टीची निवड केली आहे.
समाजातील सर्व थरातल्या लोकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आता पक्षाच्या माध्यमातून काम करणार असल्याचे प्रा. चाटे म्हणाले. भविष्यकाळातही आपापल्या क्षेत्रात मोठी कामगिरी करणार्यां पक्षात प्रवेश दिला जाईल, असे या वेळी विलास गरुड यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.