आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधू दंडवते यांचा मुलाचा ‘आप’मध्ये प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माजी केंद्रीय रेल्वेमंत्री, जनता दलाचे दिवंगत नेते मधू दंडवते यांचा मुलगा उदय यांनी गुरुवारी मुंबईत आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. पक्षाच्या प्रवक्त्या प्रीती शर्मा-मेनन यांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे ‘आप’चे सदस्यत्व घेतले असले, तरी निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय होण्याचा तूर्त विचार नसल्याचे उदय यांनी स्पष्ट केले.
उदय यांनी अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला सातत्याने पाठिंबा दिला आहे. राळेगण येथे जाऊन अनेकदा त्यांनी हजारे यांच्याशी चर्चा केली होती.
‘आप‘च्या उदयाबद्दल दंडवते यांनी आंतरराष्‍ट्रीय स्तरांवरील मासिकात अनेक लेखही लिहिले आहेत. उदय यांचे पिता प्रा. मधू दंडवते कोकणातील राजापूर मतदारसंघातून पाच वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. मोरारजीभाई देसाई व व्ही. पी. सिंग यांच्या मंत्रिमंडळात ते सदस्य होते.
कोण आहेत उदय?
* अमेरिकेमधील सॅनफ्रॅन्सिस्को येथे संस्था.
* या संस्थेत मानववंशशास्त्रज्ञ, मानसशास्त्र, जीवनशैली, सामाजिक स्थित्यंतरे आणि भाषा यांचा अभ्यास केला जातो.
* मानववंशशास्त्र विषयावरील अनेक शोधनिबंध
* अमेरिकेतील राजकारण आणि भारतातील अलीकडच्या प्रगतीविषयी सातत्याने इंग्रजी आणि मराठीत लिखाण.