आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅगीवरील बंदी सशर्त मागे, विक्री नाही, ताज्या चाचण्या करण्याचे हायकोर्टाचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मॅगीवर एफएसएसएआय व राज्याच्या अन्न सुरक्षा विभागाने लावलेली बंदी हायकोर्टाने सशर्त उठवली आहे. मात्र, सहा आठवड्यांत तीन एनएबीएल प्रयोगशाळांत नमुने तपासून शुद्धता सिद्ध करण्याचे आदेश कोर्टाने नेस्लेला दिले. यामुळे सध्या मॅगीचे उत्पादन वा त्याची विक्रीही करता येणार नाही.
एमएसजी व शिशाचे प्रमाण जास्त असल्याचे सांगत एफएसएसएआयने जूनमध्ये मॅगीच्या नऊ उत्पादनांवर बंदी घातली. त्याला नेस्लेने आव्हान दिले. बंदी आणताना नैसर्गिक न्यायाच्या सिद्धांताचे पालन झाले नसल्याचे म्हणत कोर्टाने बंदीचा आदेश रद्द केला. यापूर्वी नमुन्यांची चाचणी झालेल्या प्रयोगशाळा प्रमाणित नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे.
कोर्टाने नेस्लेला पाच-पाच नमुने मोहाली, हैदराबाद व जयपूरच्या प्रयोगशाळांत पाठवण्याचे आदेश दिले.

काेर्टाचा पर्याय खुला
या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचा पर्याय खुला असल्याचे अन्न नियामक एफएसएसएआयचे अध्यक्ष आशिष बहुगुणा यांनी म्हटले आहे.