आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maggi Lovers Rejoice Bombay Hc Lifts Ban On The Two Minute Noodles

\'मॅगी नूडल्स\' खायचीय मग महाराष्ट्रात या, मुंबई हायकोर्टाने मॅगीवरील बंदी उठवली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई हायकोर्टाने नेस्ले कंपनीला मोठा दिलासा देत महाराष्ट्रात 'मॅगी'वरील बंदी उठवली आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस् अथॉरिटी ऑफ इंडियाचे (एफएसएसएआय) मॅगीवरील बंदी आदेश बेकायदा असल्याचे कोर्टाने आपला निर्णय देताना म्हटले आहे. मॅगीवरील बंदी उठवताच नेस्लेचे शेअर पाच टक्क्यांनी वधारले आहेत.

मॅगी नूडल्समध्ये मोनोसोडियम ग्लूटामेट म्हणजेच शिसे प्रमाणाप्रेक्षा जास्त असल्याचे एफएसएसआयने म्हटले होते. नंतर महाराष्ट्रासह देशात नेस्ले इंडियाच्या मॅगी न्यूडल्सवर बंदी घालण्यात आली आहे.

हायकोर्टाने निर्णय देताना काही अटी घातल्या आहेत. मॅगी नूडल्सची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. मोहाली (पंजाब), हैदराबाद व जयपूर येथील प्रयोगशाळांमध्ये मॅगी नूडल्सची प्रत्येकी पाच सँपल्स चाचणीसाठी पाठवण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. पुढील सहा आठवड्यांच्या आत अहवाल मागवण्यात आला आहे. प्रयोगशाळांनी क्लीन चिट दिल्यानंतर नेस्ले कंपनी मॅगीचे उत्पादन आणि विक्री करु शकते, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.