आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maha Cm Meeting With Union Minister For Urban Development Shri Naidu At Mumbai For Pune Metro

पुणे मेट्रोवरून होणारे राजकारण थांबविण्याचा भाजपचा प्रयत्न, नायडूंनी घेतली CM ची भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपूर मेट्रो भूमिपूजनाचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी दिमाखदार सोहळ्यात पार पडले)
मुंबई- पुणे मेट्रोचा प्रस्ताव नागपूर मेट्रोच्या आधी पाठवूनही केंद्राने तो मंजूर केल्याने व त्याचे भूमिपूजन झाल्याने त्यावरून होणारे राजकारण थांबविण्याचा प्रयत्न भाजपने सुरु केला आहे. केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज सकाळी मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेऊन पुणे मेट्रोसह मुंबईतील मेट्रो फेज-2 व मेट्रो फेज-3 याबाबत माहिती घेतली. पुणे मेट्रोला तीन दिवसात मंजूरी देऊ असे नायडू यांनी कालच पत्रकारांना नागपूरात सांगितले होते.
नागपूरमध्ये काल सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व नगरविकासमंत्री नायडू यांच्या उपस्थितीत नागपूर मेट्रोचे भूमिपूजन झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अनुपस्थितीत होते. यामागे मोदींच्या कार्यक्रमात विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांची हुर्यो उडविली जात असल्याचे कारण असले तरी मुख्यमंत्र्यांनी पुणे मेट्रोचा प्रस्ताव आधी देऊनही नागपूर मेट्रोला मंजूरी देऊन भाजप व नितीन गडकरी राजकारण करीत असल्याचा आरोप केला होता. तसेच पुणे मेट्रोबाबत राज्य सरकारच्यावतीने कोणतीही त्रुटी ठेवली नसल्याचे म्हटले होते.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कधीही खोटे बोलत नाहीत व अवास्तव राजकीय भाष्य करीत नाहीत अशी त्यांची ओळख आहे. पुणे मेट्रोला मंजूरी का दिली नाही याबाबत प्रक्रिया पूर्ण केले नसल्याचे गडकरींनी स्पष्टीकरण दिले तरी केंद्रीय मंत्र्यांनी याबाबत सूचक मौन बाळगले होते. त्यानंतर काल सायंकाळी नागपूरात पत्रकारांशी बोलताना नायडूंनी पुणे मेट्रोला तीन दिवसात मंजूरी देणार असल्याचे सांगितले होते. तसेच या कार्यक्रमाला मुख्यमंत्री चव्हाण यांची अनुपस्थिती कमी दाखवत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे मुख्यमंत्री चव्हाण यांचे आरोप काही प्रमाणात योग्य असल्याची भावना राज्यातील जनतेत निर्माण झाली. आगामी काळात काँग्रेस-राष्ट्रवादी राजकारण करेल व त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसेल यामुळे नायडूंनी सीएम चव्हाण यांची भेट घेऊन हे विषय मार्गी लावत असल्याचे सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादीने नितीन गडकरींमुळे नागपूरला झुकते माप दिल्याचे आरोप केले होते.
पुढे वाचा, आणखी यासंदर्भात माहिती...