आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maha Govt. Announce Karza Maafi This Monsoon Session

शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पॅकेज? लवकरच निर्णय होण्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसाळी आधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस - Divya Marathi
पावसाळी आधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई - गेल्या तीन वर्षांच्या टंचाईस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना फडणवीस सरकारकडून खास ‘पॅकेज'ची भेट याच अधिवेशनात मिळण्याची चिन्हे आहेत. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी 'दिव्य मराठी'ला याबाबत माहिती दिली.

खडसे म्हणाले, शेतकऱ्यांना सध्याच्या दोन विमा योजनांऐवजी सर्वंकष विम्याचे कवच दिले जाणार आहे. आर्थिक दुर्बल, अल्पभूधारकांसाठी वेगळी योजना आखली जात आहे. कर्ज फेररचना, व्याजमाफी आदी ‘पॅकेज'चीही घोषणा लवकरच केली जाईल. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची झाल्यास सुमारे २४ हजार कोटी रुपये लागतील. मात्र कर्जमाफी दिल्यानंतरही त्यांच्या आत्महत्या थांबतीलच, असे खात्रीने सांगता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्ज घेण्याचीच वेळ येऊ नये असा आमचा प्रयत्न आहे. गारपीट आणि वादळी पावसाने नुकसान झालेल्या २० लाख शेतकऱ्यांना ४०२ कोटी रुपयांची मदत गेल्या आठवड्यातच करण्यात आल्याचे खडसे म्हणाले.
खुलाशाला उशीर
कर्जमाफी हा एकमेव मार्ग नसून अनेक पर्यायांपैकी तो एक असल्याचे आपले मत अाहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. परंतु हा खुलासा करायला त्यांनी उशीर केला.
- राधाकृष्ण विखे, विरोधी पक्षनेते.