आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना पॅकेज, सुविधांवर जास्त भर, कर्जमाफीवर चर्चेस सरकार अखेर राजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शेतकऱ्यांच्याकर्जमाफीच्या प्रश्नावर सलग चौथ्या दिवशीही विरोधक आक्रमक राहिल्याने फडणवीस सरकारला अखेर नरमाईची भूमिका घेणे भाग पडले आणि सर्व कामकाज बाजूला ठेवून गुरुवारी विधान परिषदेत चर्चा सुरू करावी लागली. या चर्चेनंतर सरकार शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याची शक्यता असून त्यात सुविधांवर भर दिला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
आक्रमक विरोधकांमुळे गुरुवारीही विधान परिषदेचे कामकाज तीनवेळा तहकूब झाले. सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी नियम २६० च्या प्रस्तावावर चर्चा घेण्याचे जाहीर केल्याने कामकाज सुरळीत झाले.

या प्रस्तावावर सरकार आणि िवरोधी अशा दोन्ही बाजूचे सदस्य बोलणार आहेत. त्यामुळे ही चर्चा दोन िदवस चालण्याची शक्यता आहे. शुक्रवारी दुपारी चर्चा संपल्यानंतर सरकारच्या वतीने कर्जमाफीसंदर्भात उत्तर िमळण्याची अपेक्षा आहे.

मुख्यमंत्र्यांचे घूमजाव
शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही असे बोललोच नाही, असे घूमजाव मुख्यमंत्र्यांनी केल्यावर गेले तीन दिवस कर्जमाफीवरून निर्माण झालेला तिढा सुटला असून विरोधकांनी विधानसभेच्या कामकाजात भाग घेतला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना दिलासा मिळत नाही तोच विरोधकांनी शेतकरी आत्महत्यांच्या मुद्द्यावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले. चर्चा सुरू करताना अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची वाट पाहणार आहे, असा सवाल विरोधकांनी केला.

पॅकेजमध्ये खते, बियाणे आणि पाण्याची सोय
संभाव्यविशेष पॅकेजमध्ये पेरणीची सामग्री, खते, बियाणे, नांगरणीची सुविधा देणे, पहिल्या पेरणीनंतर पावसाने ओढ दिल्यास पुन्हा पाणी देण्याची व्यवस्था यावर भर असेले. या सुविधा दिल्यास शेतकऱ्याला वारंवार कर्ज काढावे लागणार नाही. हा खर्च कर्जमाफीच्या रकमेपेक्षा खूपच कमी असणार आहे. त्यामुळे तिजोरीवरही कमी भार पडणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...