आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीचा निधी मुंबईतील शक्ती मिलची मालमत्ता विकून उभारणार, चंद्रकांत पाटील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
कोल्हापूर - कोर्टाकडून विक्रीवर स्थगिती असतानाही मुंबईतील शक्ती मिलची मालमत्ता लवकरच ताब्यात घेणार असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. कोर्टाची स्थगिती हटवण्यासाठी राज्य सरकार वकिलांची फौज उभी करणार आहे. याच मिलची मालमत्ता विकून मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीचा निधी उभारला जाणार आहे अशी माहिती पाटील यांनी कोल्हापुरात बोलताना दिली आहे. 
 
 
- बंद पडलेली मुंबईतील शक्ती मिल महिला पत्रकारावर झालेल्या बलात्कारामुळे चर्चेत आली होती. सुत्रांच्या माहितीनुसार, या मिलच्या मालमत्तेची किंमत जवळपास 38 हजार कोटींच्या घरात आहे. शक्ती मिलची विक्री करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निधी उभारता येईल असे महसूलमंत्री म्हणाले आहेत. 
- उल्लेखनीय बाब म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली त्याचवेळी केंद्र सरकारने हात वर केले. जे राज्य कर्जमाफी जाहीर करतील त्यांनीच निधी देखील उभा करावा असे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी त्याचवेळी स्पष्ट केले. त्यामुळे, राज्य सरकार कर्जमाफीचा निधी कसा जमवणार असा प्रश्न निर्माण झाला होता. 
- दरम्यान शक्ती मिलच्या मालमत्तेच्या विक्रीवर न्यायालयाची स्थगिती आहे. तरीही, ही बंदी हटवण्यासाठी वकिलांची फौज तयार करणार असल्याचे आश्वासन महसूलमंत्र्यांनी दिले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...