आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maha Govt To Take Action Against Illegal Mobile Towers

मोबाइल टॉवरबाबत नवे धोरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मोबाइल टॉवरबाबत सध्या केंद्रीय धोरण आहे परंतु त्यात काही सुधारणा करण्याचा राज्य सरकार विचार करीत असून त्या लवकरच करण्यात येतील. यामध्ये महानगरपालिकांना मिळणारी फी वाढवण्याचा विचारही केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला स्पष्ट केले.

अमरावती महापालिका क्षेत्रात विनापरवानगी मोबाइल टॉवर उभारण्यात येत असल्याबद्दलचा तारांकित प्रश्न डॉ. सुनील देशमुख यांनी उपस्थित केला होता. अमरावती महापालिका क्षेत्रात १५२ मोबाइल टॉवर असून शासनाच्या मार्च २०१४ च्या धोरणानुसार कोणत्याही टॉवरला परवानगी दिलेली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. मोबाइल टॉवरमधून येणार्‍या किरणांमुळे कॅन्सर होत असल्याचे आढळून आल्याने या किरणांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सुरू करावी अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, टॉवर्सबाबत २०१३ मध्ये एक कायदा करण्यात आला असून टीईआरएमने काही मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. त्यानुसारच मोबाइल टॉवर उभारण्यात येत आहेत. मात्र या मार्गदर्शक तत्त्वांची पायमल्ली करून टॉवर उभारल्याचे आढळून आल्यास ते सील केले जातात असेही त्यांनी स्पष्ट केले.