आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maha Guv Not In Favour Of Appointing New Members On Chitale

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘चितळे समितीत नवीन सदस्य नाहीच’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्याच्या जलसंपदा विभागातील 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याची चौकशी करणार्‍या डॉ. माधवराव चितळे समितीवर नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यास राज्यपालांचा विरोध असल्याचे राज्य सरकारच्या वतीने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाला स्पष्ट केले. महाधिवक्ता दारीस खंबाटा यांनी ही माहिती दिली. याचिकाकर्त्यांच्या मागणीनुसार नवीन सदस्यांची नियुक्ती करणार की नाही, यासंदर्भात न्यायालयाने राज्यपालांकडून माहिती मागवली होती. सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव घाटुळे यांनी समितीवर तज्ज्ञांची नियुक्ती करावी किंवा तपास सीबीआयकडे सोपवावा यासाठी याचिका दाखल केली आहे. समितीने सर्व माहिती गोळा केली असून आता प्रत्यक्ष पाहणी सुरू असल्याचे खंबाटा यांनी सांगितले.