आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ST चालकामुळे वाचले शेकडाे प्राण, वेळीच गाडी थांबवली नसती तर झाला असता मोठा अनर्थ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाबळेश्वर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीला पूर, प्रलयाने जुना पूल काेसळला. इन्सेटमध्‍ये बसचालक संजय केदार - Divya Marathi
महाबळेश्वर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीला पूर, प्रलयाने जुना पूल काेसळला. इन्सेटमध्‍ये बसचालक संजय केदार
मुंबई - मुसळधार पाऊस काेसळत असला तरी महापुरामुळे महाडचा पूल काेसळेल याची काेणालाही कल्पना नव्हती. पुलावर पाणी नसल्यामुळे पुढे काही घडले असेल अशी शंकाही येऊ शकत नव्हती. या पुलावरून गाडी घेऊन जात असलेल्या गुहागर – भांडूप या एसटी बसचे चालक संजय केदार यांनाही परिस्थितीचा अंदाज नव्हता. पण पुलाच्या मध्यभागी उभ्या असलेल्या क्वालिसला बघून काहीतरी विपरित घडलंय अशी त्यांना शंका अाली. नंतर एसटीच्या प्रकाशझाेतातून हा जुना पूल अर्ध्यावर काेसळला असल्याचे त्यांच्या लक्षात अाले. त्याच वेळी केदार यांनी तातडीने बस मागे नेऊन पुलाच्या दिशेने येत असलेली इतर वाहतूक थांबवली. त्यांच्या या प्रसंगावधानामुळे इतर वाहनांतील अनेक प्रवाशांचे प्राण वाचू शकले.

या भीषण दुर्घटनेबाबत अनुभव सांगताना बसचालक केदार म्हणाले, ‘बस घेऊन टाेलनाक्यावर अालाे त्या वेळी पुढे एक क्वालिस पुलाच्या मधाेमध थांबली हाेती. कदाचित पुढच्या गाड्या पुलावरून पडल्याचे त्याच्या लक्षात अाले हाेते. म्हणून ताे लगेच रिव्हर्स घेऊन निघून गेला. हा प्रकार पाहून माझ्याही मनात शंकेची पाल चुकचुकली. काहीतरी घटना घडली असावी असे वाटून मी बस थांबवली. एसटीच्या हेडलाइटमधून पुढे पूल पडला असल्याचे दिसल्यावर ५०० मीटर बस मागे घेऊन तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली व सर्व वाहतूक बंद करण्यास सांगितले. त्या वेळी अामच्या बसच्या मागे पाच- सहा वाहने हाेती. त्यांनाही पुलावर जाण्यापासून वेळीच थांबविले. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले.’ संजय केदार याच्यापाठाेपाठ अर्ध्या तासाने चिपळूण येथून गुहागर–भांडूप ही बस सुटणार हाेती. मात्र केदार यांनी चिपळूण नियंत्रण कक्षात संपर्क साधून पूल पडल्याची माहिती दिली. त्यामुळे ही बसही या मार्गाने अाली नसल्याची माहिती केदार यांनी दिली.
पुढे वाचा...
> बेपत्ता प्रवासी
> अपघाताबाबत काय म्हणतात तज्ज्ञ ?
बातम्या आणखी आहेत...