आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप-शिवसेनेच्या विरोधात महादेव जानकर मुंबई मनपात लढणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपचा मित्रपक्ष राष्ट्रीय समाज पक्ष हा अागामी मुंबई महापालिका निवडणुकीत सर्व २२७ जागा लढवणार आहे. केवळ धनगर समाजाचा पक्ष ही प्रतिमा पुसून समाजाच्या सर्व स्तरात जाण्याचा आमचा निर्धार असून बडोदा महानगरपालिकेत रासपचे ६ नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबईत रासप खाते तर उघडलेच, पण नगरसेवकांची संख्याही दोन आकडी संख्या पार करेल, असा विश्वास रासपचे अध्यक्ष अामदार महादेव जानकर यांनी व्यक्त केला.

रासप राष्ट्रीय पक्ष होण्याकडे वाटचाल करत असून २६ राज्यांमध्ये पक्षाची कार्यकारिणी अाहे. नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत आम्ही भाजपला ताकदीची जाणीव करून दिली. आता आमचे लक्ष्य आहे ते मुंबई महापािलका. युतीविषयी एकदा भाजपला विचारून पाहिले जाईल. मात्र, त्यांनी प्रतिसाद न दिल्यास स्वतंत्रपणे निवडणूक लढवू, असे जानकर यांनी स्पष्ट केले.