आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यातील पशुधनासाठी प्रत्येक तालुक्यात फिरता दवाखानाd

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील पशुधनाला वेळेवर आरोग्यविषयक सेवा मिळाव्यात, पशुपैदास वाढावी आणि शेतकऱ्यांमध्ये पशुसंंवर्धनाशी संबंधित सेवांबद्दल जागृती होण्यासाठी राज्यात प्रत्येक तालुक्यात एक फिरते पशुवैद्यकीय दवाखाना उघडण्याचा निर्णय पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास (पदुम) विभागाने घेतला आहे. यासाठी लागणाऱ्या वाहनांना मोठा निधी लागणार असल्याने भाड्याने वाहने घेऊन हे फिरते दवाखाने सुरू करण्याचा सरकार विचार करत आहे.
राज्यात ३५५ तालुके असून गाई, बैल, म्हशी, रेडे, शेळ्या व मेंढ्या यांच्यासह एकूण पशुधन सुमारे सव्वातीन कोटी आहे. या पशुधनाच्या उपचारांसाठी राज्यात केवळ ४ हजार पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. पशुधनाचे पालन ग्रामीण आणि दुर्गम भागात होत असल्याने मोठ्या प्रमाणावर हे पशुधन वैद्यकीय सेवांपासून वंचित राहते. त्यामुळे उपचाराअभावी मृत्युमुखी पडणाऱ्या पशुधनाची संख्या मोठी आहे. यावर तोडगा म्हणून फिरते पशुवैद्यकीय दवाखाने सुरू करण्यात आले असले तरी त्यांची संख्या राज्यात ७० च्या आत आहे. त्यामुळे ही संख्या ३५५ इतकी वाढवून प्रत्येक तालुक्यात किमान एक फिरता दवाखाना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे दवाखाने प्राधान्याने दुर्गम किंवा अतिदुर्ग गावांना सेवा पुरवतील, अशी योजना पदुम मंत्री महादेव जानकर यांच्या पुढाकाराने तयार केली आहे.
हा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात येणार आहे. या योजनेसाठी प्रत्येक वाहनास इंधन, चालकाचे वेतन यासह दरमहा ४० हजार रुपये भाडे देण्यात येणार असून दरमहा १ कोटी ४२ लाख इतका खर्च अपेक्षित आहे.

तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध होणार : जानकर
अनेक गावे दुर्गम भागांत असल्याने अशा िठकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यातून वेळेवर सेवा पुरवणे शक्य हाेत नाही. दवाखान्यांकडे स्वतंत्र वाहने नाहीत. त्यामुळे जनावरांना वेळेवर वैद्यकीय सेवा न िमळाल्याने त्यांचा मृत्यू होतो. हे टाळ्ण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक फिरते पशुवैद्यकीय िक्लनिक सुरू करण्याचा िवचार आहे. या प्रस्तावाबाबत केंद्र सरकारशी चर्चा झाली असून त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद िमळत असल्याचे महादेव जानकर यांनी सांिगतले.
माेबाइल क्लिनिकमध्ये मिळतील सेवा : जनावरांची अाराेग्य तपासणी, तत्काळ राेगनिदान करून उपचार, राेग सर्वेक्षण करून आजारांवर िनयंत्रण करणे, साथीचे राेग झाल्यास त्वरित सेवा पुरवणे, कृत्रिम रेतन करणे, बेरड वळूचे खच्चीकरण, शेळी नमुने अायुर्वेदिक अाैषधांचा वापर करणे. तसेच शेतकऱ्यांमध्ये जागृती करणे.

नाशिकमध्ये सर्वाधिक पशुधन : २०१२ मध्ये पशुगणनेनुसार राज्यात गाई-बैल, म्हशी-रेडे, शेळ्या-मेंढ्या असे एकूण ३ कोटी २४ लाख ८९ हजार पशुधन आहे. एक कोटी ५४ लाख ८४ हजार गाई-बैल असून यात सर्वाधिक ३६ लाख ८८ हजार गाई-बैल नाशिक विभागात तर पुणे विभागात २४ लाख ८८ हजार आहे. राज्यात ५५ लाख ९५ हजार म्हशी व रेड्यांची संख्या अाहे.
बातम्या आणखी आहेत...