आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahajinabimb Rushabhdev Coffee Table Book Launched In Mumbai

‘महाजीनबिम्ब ऋषभदेव’ कॉफी टेबल बुकचे मुंबईत प्रकाशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जैन बांधवांचे तीर्थक्षेत्र असलेल्या मांगीतुंगी येथे साकारण्यात अालेल्या ‘महाजीनबिम्ब भगवान ऋषभदेव’ या प्रकल्पावर आधारित दैनिक "दिव्य मराठी'च्या काॅफी टेबल बुकचे प्रकाशन सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात
करण्यात आले.

जैन बांधवांचे सिद्धक्षेत्र असलेल्या मांगीतुंगीतील मांगीगिरीवर १०८ फूट भगवान ऋषभदेवांची मूर्ती साकारण्यात अाली अाहे. या मूर्तीचे निर्माणकार्य तसेच दिगंबर जैन धर्मीयांची परिपूर्ण माहिती या पुस्तकात सचित्र देण्यात अाली अाहे. मांगीतुंगीतील ऋषभगिरी येथे दीड महिना महामस्तकाभिषेक सोहळा सुरू हाेता. या साेहळ्यासाठी देशभरातून हजाराे जैन तसेच अजैन बांधवांची उपस्थिती हाेती. बांधवांना या तीर्थक्षेत्राची तसेच नाशिकमधील दिगंबर जैन तीर्थक्षेत्रांची संपूर्ण माहिती मिळावी म्हणून हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. त्याचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात अाले. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
या प्रकाशनावेळी ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक प्रशांत दीक्षित, ऋषभदेव मांगीतुंगी संस्थानचे स्वामी रवींद्र कीर्तीजी, नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक जयप्रकाश पवार, जनसंपर्क विभागाचे प्रमुख विकास लोळगे, नाशिक आवृत्तीचे डेप्युटी एडिटर अभिजित कुलकर्णी, पुस्तकासाठी संपादन साहाय्य केलेल्या सुवर्णा सुमेरकुमार काले, शोभा पहाडे, छायाचित्रकार अशाेक गवळी, चांदवडच्या णमाेकार तीर्थचे विजय लोहाडे, अंजनागिरी संस्थानचे अध्यक्ष पवन पाटणी, संजय पापडीवाल, चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, खासदार सुभाष भामरे, आमदार राजेंद्र पाटणी कार्यक्रमाला उपस्थित होते.

२४ तीर्थंकरांची माहिती
हिंदी भाषेतील या पुस्तकामध्ये २४ तीर्थंकरांची माहिती, मांगीतुंगी देवस्थान, भगवान ऋषभदेव, द स्टेच्यू ऑफ अहिंसा यांसह नाशिकमधील गजपंथ, णमाेकार तीर्थ, अंजनगिरी अाणि जैन प्रथा-परंपरा, मुनिचर्या, आहार-विहार अशा अनेक विषयांची माहिती अत्यंत सोप्या आणि ओघवत्या शैलीत मांडलेली आहे.
छायाचित्र: नाशिक जिल्ह्यातील भगवान ऋषभगिरी मांगीतुंगी सिध्दक्षेत्रावर आधारित आणि दै. दिव्य मराठी तथा भास्कर वृत्तपत्र समूहाच्या सहकार्याने प्रकाशित ‘महाजिनबिम्ब’ या कॉफी टेबल बुकचे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या वेळी ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक प्रशांत दीक्षित, पुस्तकासाठी संपादन साहाय्य केलेल्या सुवर्णा सुमेरकुमार काले, संस्थानचे स्वामी रवींद्र कीर्तीजी, खासदार सुभाष भामरे, आमदार राजेंद्र पाटणी आदी.