आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'महानंद\'चे दूध दोन रुपयांनी स्वस्त, 40 वरून 38 रूपयांवर दर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्य सहकारी दूध संघाने महानंद दुधाचे दर प्रतिलिटरमागे दोन रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 40 रुपये लिटर मिळणारे महानंद दूध आता 38 रुपये लिटर मिळणार आहे. दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांनी राज्य सहकारी दूध संघासह इतर खासगी व सहकारी दूध संघ-कंपन्यांना लिटरमागे 2 ते 5 रूपयांपर्यंत दर कमी करण्याचे आदेश दिले होते. याचबरोबर शेतक-यांकडून 20 रुपये लिटरपेक्षा कमी भावाने दुधाची खरेदी करू नये, असे निर्देशही सरकारने दूध संघांना दिले आहेत. महानंद दूध संघाचे संचालक मंडळ व खडसे यांच्यात नुकतीच चर्चा झाली. त्यानंतर महानंदने प्रतिलिटर दोन रूपये दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, इतर दूध संघ व कंपन्याही दर कमी करण्याची शक्यता आहे.
आंतराष्ट्रीय बाजारात दूधभुकटीचे दर कमी झाल्याने आज दूध उत्पादक शेतक-यांकडून 14 ते 19 रुपये प्रतिलिटर दराने दूध खरेदी होते. शहरांमध्ये मात्र 40 ते 60 रुपये प्रतिलिटर दराने विक्री होते, ही बाब गंभीर आहे. मुंबई-पुणेसह शहरातील लोकांना 40 ते 60 रूपयांनी दूध खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे राज्यातील दूधसंघांनी 2 ते 5 रूपयांपर्यंत प्रतिलिटर दूधाचे दर कमी करावेत असे आदेश दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांनी दूध कंपन्यांना दिले होते. शासनाने दूध खरेदीदर निश्‍चित केले असताना सहकारी आणि खासगी दूध संघ दूध भुकटीचे दर कमी झाल्याचे सांगून शेतकऱ्यांकडून कमी दराने दूध खरेदी करत आहेत, ही बाब गंभीर आहे. शासनाने निश्‍चित केलेल्या दरापेक्षा कमी दराने खरेदी करणा-या दूध संघावर कारवाई केली जाईल, असेही खडसेंनी सुनावले होते.
शासनाने सध्या निश्‍चित केलेल्या 20 रुपये प्रतिलिटर पेक्षा कमी दराने दूध खरेदी करणाऱ्या दूध संघावर कारवाई केली जाईल. दूध खरेदी ते प्रक्रिया आणि वितरण यामध्ये ग्राहक आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. दुध वितरणात एकसमान दर दिला जाईल. आमचे सरकार शेतकरी आणि ग्राहक हितासाठी कटिबद्ध आहे. दुधाच्या भेसळ नियंत्रण करण्यासाठीदेखील 50 पथके नेमून सक्त कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. शासकीय दराने दूध खरेदीसाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, त्यामुळे सहकारी आणि शासकीय दूध संघाकडून जास्तीत जास्त दुधाची भुकटी करण्यात येईल. त्यासाठी प्रसंगी तोटा सहन करून राज्यातील अतिरिक्त दुधाचा प्रत्येक थेंब राज्य सरकार खरेदी करेल, असेही खडसे अश्वस्त केले होते.
पुढे आणखी वाचा, आरेचे दुध विक्री न करणाऱ्या केंद्रांवर कारवाई, स्टॉल बंद करणार- खडसे
बातम्या आणखी आहेत...