आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानंद घोटाळ्याच्या फेरचौकशीची शक्यता, ‘राष्ट्रवादी’ला आणखी एक झटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या ‘महानंद’ या दूध डेअरीमध्ये आघाडी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या तब्बल १०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने फेरचौकशी करण्यात येईल,’ अशी माहिती पशू व दुग्ध संवर्धन मंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी दिली.

२००५ ते २०१४ दरम्यान हा घाेटाळा झाल्याचा अाराेप अाहे. सध्या माजी कार्यकारी संचालक शिवाजी तळेकर यांच्या मार्फत या घाेटाळ्याची चाैकशी सुरू अाहे. मात्र अाता नव्याने एफअायअार दाखल करून अतिरिक्त अाराेपपत्र दाखल केले जाईल, असेही खडसेंनी सांगितले. ‘एसीबी’चे महासंचालक प्रविण दीक्षित व अार्थिक गुन्हे शाखेचे सहअायुक्त धनंजय कमलाकर यांच्यासाेबत झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात अाला. दरम्यान, गेल्या पंधरा वर्षात महानंदवर काॅंग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांचेच वर्चस्व अाहे. त्यामुळे छगन भुजबळ, अजित पवार, सुनील तटकरेंपाठाेपाठ अाता राष्ट्रवादीचे इतर नेतेही गाेत्यात येण्याची चिन्हे अाहेत.

सरकारी पैशावर विदेश वारी
Áमहानंदचे वाशी, पुणे, कुडाळ व गाेव्यात पॅकेजिंग युनिट अाहेत. या ठिकाणी दरराेज १० ते १५ हजार लिटर दुधाचे पॅकिंग हाेत असताना या युनिटमधून तब्बल ५० हजार दूधाच्या पॅकेजिंगचे पैसे अदा करण्यात अाले अाहेत.

-महानंदच्या अधिकाऱ्यांनी डेअरीच्या पैशावर बेकायदा व विनापरवाना विदेशी दाैरे केले.
-संचालकांनी अापल्या प्रसिद्धीसाठी, ग्रीटिंग कार्डवर जाहिरातींसाठी पैसा खर्च केल्याचा अाराेप अाहे.