आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापरिनिर्वाण िदनाची जय्यत तयारी, शिवाजी पार्क परिसरात चोख पोलिस बंदाेबस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महापरिनिर्वाण दिनी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी देशभरातून भीमानुयायी दादरमध्ये दाखल होऊ लागले आहेत. महापरिनिर्वाणदिनी एक दिवसावर ठेपला अाहे. भीमानुयायांना सुरक्षा आणि त्यांना सर्व प्रकारच्या प्राथमिक सोयी-सुविधा पुरवण्यासाठी मुंबई महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. राज्यात निघत असलेल्या जातीय मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिस सर्व प्रकारची खबरदारी घेत आहेत.

शिवाजी पार्क मैदानात लाख २५ हजार चौरस फूट मंडपाची व्यवस्था केली आहे. माहिती कक्ष, ११ रुग्णवाहिका, ५० क्लोज सर्किट टीव्ही, ४४ मेटल डिटेक्टर, बॅग स्कॅनर, ६० हँडहेल्ड मेटल डिटेक्टर, ३५० ट्यूबलाइट्स, २३० हॅलोजन, ५० पेडेस्टंट फॅनची मैदानात व्यवस्था करण्यात आली आहे. ३०० मोबाइल चार्जिंग पॉइंट्स, २०० फिरती शौचालये, २०० स्नानगृहे, अग्निशमन इंजिन, बोटी, पाण्याचे ३२० नळ, १५ टँकर्स, २६० स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. दिशा कळावी म्हणून शिवाजी पार्क आणि चैत्यभूमीवर आकाशात मोठे बलून असतील, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी सांगितली.

मध्य रेल्वेने ११ विशेष ट्रेनची सोय केली आहे. या सर्व ट्रेन अनारक्षित असणार आहेत. त्याबरोबरच उपनगरीय लोकलच्या बारा विशेष फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या जनतेच्या सोयीसाठी बेस्ट ५० अतिरिक्त बसेस चालवणार आहे.

बेस्टचे ५० डॉक्टर अहोरात्र तैनात करण्यात आले असून १००० लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत. दादर, चैत्यभूमी, शिवाजी पार्क परिसरातील बंदोबस्तासाठी १५०० पोलिस २०० पोलिस अधिकारी सज्ज आहेत. त्यांच्या दिमतीला अडीच हजार समता सैनिक दलाचे सैनिक असणार आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर स्मारक उभारण्यात येणार असलेल्या इंदू मिलचे दरवाजे जनतेसाठी उघडण्यात येणार आहेत.

ड्रोनने राहणार लक्ष
यंदाप्रथमच चैत्यभूमी परिसरावर दोन ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे पोलिस लक्ष ठेवणार आहेत. सुरक्षेची खबरदारी म्हणून शिवाजी पार्क मैदान चोहोबाजूंनी पत्र्यांनी बंदिस्त करण्यात आले आहे. वंदन रांगेतील भीमानुयायांना सावली िमळावी यासाठी चैत्यभूमी ते सि
बातम्या आणखी आहेत...