आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यंदाचा महापरिनिर्वाण दिन अधिक संवेदनशील, अनुचित घटनेची गुप्तचरांना भीती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दरवर्षी सहा डिसेंबर राेजी डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी दादरच्या चैत्यभूमीवर देशभरातील भीमानुयायांचा जनसागर उसळत असतो. गेले काही महिने राज्यात मराठा अाणि दलितांचे लाखोंचे मोर्चे निघत अाहेत, त्यामुळे राज्यात जातीय तणाव वाढलेला आहे. परिणामी यंदाच्या सहा डिसेंबरला चैत्यभूमीवर येणाऱ्या गर्दीचा लाभ उठवत समाजकंटक काही अनुचित घटना घडवू शकतात, असा इशारा गुप्तचरांनी दिला आहे, त्यामुळे पाेलिस व महापालिका प्रशासन सतर्क झाले अाहे.

दरवर्षी सहा डिसेंबरला चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांची संख्या सुमारे सहा ते आठ लाखांवर असते. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरात मुंबई पालिकेच्या वतीने मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यात येत असतात. त्याच्या नियोजनासाठी पोलिस अाणि पालिका दरवर्षी एकत्रित बैठक घेऊन तयारी करत असतात.

यंदाची परिस्थिती मात्र वेगळी आहे. राज्यात मराठा क्रांती मोर्चांनी वातावरण ढवळून काढले आहे. लाखाेंच्या संख्येने निघणाऱ्या या क्रांती मोर्चाविरोधात दलित-ओबीसी यांचे प्रतिमोर्चे जोरात िनघत आहेत. या माेर्चा- प्रतिमाेर्चाचे पडसाद सहा डिसेंबर राेजी चैत्यभूमीवर उमटण्याची भीती गुप्तचर विभागाने सरकारकडे व्यक्त केली अाहे. त्यामुळे यंदा चाेख बंदाेबस्त व उपाययाेजना करण्यात येणार अाहेत.

तिप्पट पाेलिस तैनात
- शिवाजी पार्क मैदान संपूर्ण पत्र्यांनी बंदिस्त करणे, सीसीटीव्हींची संख्या तिप्पट केली अाहे. मैदानाच्या पाचही प्रवेशद्वारांवर मेटल डिटेक्टर बसवण्यात येणार आहेत. तिप्पट पोलिस बंदोबस्त, सुमारे चार हजार पाेलिस बंदाेबस्तावर.
- बाबरी मशीद सहा डिसेंबरलाच पाडण्यात अाल्यामुळे या दिवशी मुंबईत दरवर्षी मुळात मोठा बंदोबस्त असतो. आता महापरिनिर्वाण दिनीही पाेलिसांवर ताण वाढणार अाहे.
- साठ वर्षात प्रथमच महापरिनिर्वाण दिनी मुंबई जिल्ह्यात ड्राय डे घोषित.
बातम्या आणखी आहेत...