आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashra Corporation Appointments May Be Announced Shortly

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्य महामंडळांवरील नियुक्त्यांसाठी मंत्र्यांकडे गर्दी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील विविध महामंडळावर अध्यक्षांच्या न झालेल्या नेमणुका जुलैमध्ये होण्याची शक्यता असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या इच्छुकांची मंत्र्यांकडे शिफारस पत्रासाठी गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकांनंतर मुख्यमंत्रिपदी आलेल्या अशोक चव्हाण यांनी महामंडळावरील नियुक्त्यांबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता. अशोक चव्हाण यांच्यानंतर मुख्यमंत्रिपदी पृथ्वीराज चव्हाण आल्यानंतर नियुक्त्या होतील अशी आशा इच्छुकांना वाटू लागली होती. परंतु पृथ्वीराज चव्हाण यांनीही या नियुक्त्यांबाबत सबुरीचा मार्ग स्वीकारला होता. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी गेल्या वर्षी महामंडळाच्या नियुक्त्या लवकरच केल्या जातील असे सांगितले होते. त्याच वेळेस राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी आमची यादी तयार असून काँग्रेसने यादी घोषित करताच नियुक्त्या घोषित केल्या जातील असे सांगितले होते.
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ विकास महामंडळे, मुंबई, कोकण म्हाडा मंडळ, सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणारी विविध महामंडळे, लघुउद्योग, अल्पसंख्याक विकास, महिला औद्योगिक विकास महामंडळ अशी एकूण 65 महामंडळे राज्यात आहेत. महामंडळाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा असतो. जुलैच्या दुसºया आठवड्यात महामंडळावरील अध्यक्षांच्या नेमणुका केल्या जाणार असून यासाठी दोन्ही पक्षातील पदाधिकाºयांबरोबरच माजी आमदारांनीही फील्डिंग लावल्याची माहितीही सूत्रांनी दिली. काँग्रेसकडे खाते असलेल्या विभागाशी संबंधित महामंडळाचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर राष्ट्रवादीकडे खाते असलेल्या विभागाशी संबंधित महामंडळाचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्याचे ठरल्याचेही सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडे गेल्या काही दिवसात 50 च्या आसपास शिफारस पत्रे पाठवण्यात आल्याचे समजते. काँग्रेसच्या एका वरिष्ठ मंत्र्यांने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करावी म्हणून आमच्याकडे कार्यकर्त्यांच्या पत्रांचा ढीग लागला आहे. या पत्रांमध्ये आपण पक्षासाठी किती काम केले असून अध्यक्षपदासाठी कसे योग्य आहोत हे ठसवण्याचा प्रयत्न केला आहे.
मुख्यमंत्र्यांकडे आम्ही शिफारस पत्रे पाठवली आहेत, परंतु त्यावर अजून काहीही निर्णय झालेला नाही. येत्या एक-दोन आठवड्यात मुख्यमंत्री अध्यक्षपदाबाबत निर्णय घेतील अशी आशा आहे. त्यामुळे अनेकांचे लक्ष याकडे लागले आहे.