आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashta & Uttrankhad State Agricultural Tie Up

महाराष्ट्र-उत्तराखंड राज्यादरम्यान फळे-फुलांबाबत सामंजस्य कराराबाबत चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- उत्तराखंडचे कृषीमंत्री हरकसिंग रावत यांनी राज्याचे कृषीमंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेऊन दोन्ही राज्यांमध्ये परस्पर समन्वयाने फळांच्या आणि फुलांच्या विपणानासाठी सहकार्य करण्याबाबत चर्चा केली.
उत्तराखंडने विविध प्रकारची फळे आणि फुलांच्या उत्पादन वाढीवर विशेष भर दिला आहे. हा शेतीमाल योग्य तो प्रक्रिया करुन मध्यस्थांच्या मार्फत न देता थेट विक्रीसाठी महाराष्ट्रात पाठविला जाईल, यासाठी महाराष्ट्र शासनाने जागा उपलब्ध करुन दिल्यास उत्तराखंडमधील फळे आणि फुले थेट महाराष्ट्रात पाठविता येणे शक्य होईल. महाराष्ट्रातील फळे देखील उत्तराखंडमध्ये नेण्यात येतील, यामुळे शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो असे उत्तराखंडच्या कृषीमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
खडसे म्हणाले, फलोत्पादनात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. राज्यात अनेक प्रकारच्या फळांचे उत्पादन घेतले जाते. द्राक्ष, संत्री, केळी, आंबा या प्रमुख फळांबरोबरच अन्य फळे देखील मोठ्या प्रमाणावर पिकविली जातात आणि विशेष म्हणजे यातील बहुतांश फळे निर्यात देखील केली जातात. उत्तराखंडच्या कृषी विभागाने दिलेल्या प्रस्तावावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल आणि या दृष्टीने सामंजस्य करार करण्याबाबतही विचार करण्यात येईल.