आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावी गणिताचा पेपर फुटला; दोघांना अटक, परीक्षेच्या 20 मिनिटे आधीच व्हॉट‌्स‌अॅपवर व्हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे/मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ घेत असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला पहिल्या दिवसापासून पेपरफुटीचे ‘ग्रहण’ लागले आहे. सोमवारी होणारा गणिताचा पेपर रविवारी रात्रीच फुटला आणि  परीक्षेच्या २० मिनिटेआधी व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला. कोकण बोर्डाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी याबाबत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मुंबईतील मालाड येथील  राहुल भास्कर आणि अझरुद्दीन शेख या दोघांना अटक केली. त्यांनी पेपर कसा लीक केला याबाबत पोलिस तपास करत आहेत. 

या पेपरफुटीनंतर परीक्षा केंद्रावर उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश बोर्डाने परीक्षा केंद्रांना दिले आहेत. परीक्षेआधीच पेपर लीक होत असल्याने सायबर सेलकडे तक्रारी आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली. गेली दोन – तीन वर्षे परीक्षांचे पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल होण्याचे प्रकार वाढले आहेत. यावर उपाय म्हणून परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी आणि शिक्षक-परीक्षक बारावी गणिताचा पेपर फुटला; दोघांना अटक
कुणालाही मोबाइल वापरास बंदी घातली आहे. राज्यभरात बारावीची परीक्षा देणारे सुमारे १५ लाख तर दहावीची परीक्षा देणारे सुमारे १७ लाख विद्यार्थी असतात. परीक्षेची प्रत्यक्ष कार्यवाही सांभाळण्यासाठी सुमारे एक लाखाचा स्टाफ कार्यरत असतो. ही संख्या विचारात घेता, प्रत्येकाच्या मोबाइलची वैयक्तिक तपासणी ही अवघड बाब असल्याचे म्हमाणे यांनी सांगितले.   
पुनर्परीक्षेबाबत बोर्ड गप्पच : 
सोमवारचा गणिताचा बारावीचा पेपर नियोजित वेळेपूर्वी २० मिनिटे व्हायरल झाला. मराठीच्या पेपरबाबतही हाच प्रकार घडला होता. सेक्रेटरियल प्रॅक्टिसचा पेपरही फुटल्याची चर्चा होती. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वर्गात साडेदहापासून प्रवेश दिला जातो आणि पेपर सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे प्रश्नपत्रिका दिली जाते. त्यामुळे या वेळात पेपर नेमका लीक कसा होतो, याची शंका बोर्डानेही व्यक्त केली आहे. कथित पेपरफुटीप्रकरणी फुटलेल्या पेपरची परीक्षा पुन्हा होणार का, या प्रश्नावर कोणतीही प्रतिक्रिया बोर्डाने दिली नाही.   
 
सीसीटीव्हीचा प्रस्ताव   :
पेपर फुटीप्रकरणी राज्य शिक्षण मंडळाने कठोर पावले उचलली आहेत. मात्र, त्याचा तपशील उघड करता येणार नाही. मोबाइलबंदी  काटेकोरपणे अंमलात आणली जाईल. २५० भरारी पथकांची नजर अशा प्रकारांच्या शोधासाठी प्रयत्न करेल. राज्याकडे परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही लावण्यासंबंधी प्रस्ताव पाठवला आहे, असे म्हमाणे म्हणाले.
 
आजपासून १०वी परीक्षा 
माध्यमिकशालांत परीक्षा (इयत्ता दहावी) मंगळवारपासून सुरू होत आहे. राज्यभरातून १७ लाख, ६६ हजार, विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये लाख ८९ हजार ९० विद्यार्थी तर लाख, ७६ हजार, १९० विद्यार्थिनींचा समावेश आहे. एकूण २१ हजार ६८६ शाळांतून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. 
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...