आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र-कर्नाटक प्रश्न: सीमाप्रश्नी राज्याचे शपथपत्र १५ जानेवारीपूर्वी सादर करा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘गेल्या अनेक दशकांपासून रेंगाळलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नांसदर्भात सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाच्या वतीने १५ जानेवारी २०१७ पूर्वी शपथपत्र सादर करावे’, असे निर्देश मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी गुरुवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले अाहेत.

संदर्भात गठित करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीची बैठक मंत्रालयात मुख्य सचिवांच्या समिती कक्षात घेण्यात आली होती. या वेळी मुख्य सचिवांनी निर्देश दिले.

या बैठकीला तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात राज्याची बाजू सर्वोच्च न्यायालयात प्रभावीपणे मांडण्यासाठी विधिज्ञ अरविंद दातार, हरीश साळवे यांची नियुक्ती करण्यात आली. विधिज्ञ प्रभातरंजन तिवारी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या वकीलपदावर शासनाची बाजू प्रभावीपणे मांडणाऱ्या वकिलाची नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी विधी व न्याय विभागाला या वेळी दिले. तसेच न्यायालयात सादर करायची कागदपत्रे स्कॅन करून एका महिन्यात दिल्ली येथील वकील कार्यालयात पाठवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

दिल्ली येथे वकिलांना साहाय्य व्हावे यासाठी व समन्वयासाठी महाराष्ट्र शासनाकडून एक अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...