आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभेत दोन्ही काँग्रेस आमदारांचा कामावर बहिष्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - छगन भुजबळांच्या अटकेबाबत चर्चा करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या अामदारांनी मंगळवारी विधानसभेत गाेंधळ घातल्यामुळे अध्यक्षांना चार वेळा कामकाज तहकूब करावे लागले. अखेर विरोधकांनी कामकाजावर पूर्ण बहिष्कार टाकत सभात्याग केला.
जयंत पाटील यांनी भुजबळांच्या विषयावर चर्चेची मागणी केली. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील यांनीही अटकेचा निषेध करीत राज्य सरकार सूडबुद्धीची कारवाई करीत असल्याचा अाराेप केला. त्यावर भाजप अामदार अनिल गोटे बोलण्यास उभे राहिले तेव्हा विरोधकांनी गोंधळ सुरू केला. मग विरोधकांना प्रत्त्युत्तर दिले. या गाेंधळात अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही विराेधकांचा गाेंधळ सुरूच हाेता. याच गाेंधळात प्रश्नाेत्तरे सुरू झाली. मात्र पुन्हा कामकाज २० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. यानंतर पुन्हा १५ मिनिटांसाठी आणि नंतर शोकप्रस्ताव मांडून झाल्यानंतर १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. विरोधकांनी दुपारी एक वाजता कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.
पंकजा पुन्हा बचावल्या
शुक्रवारी विधान परिषदेत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या िवभागाचे तीन तारांकित प्रश्न होते. त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी पंकजा सभागृहात उपस्थितही होत्या. परंतु सभागृहाचे कामकाजच होऊ न शकल्याने चिक्की खरेदी, िबस्किट दर्जा अाणि मनरेगा मजुरीवाढ संदर्भातील पंकजा यांच्या िवभागाच्या प्रश्नांवर आजही चर्चा होऊ शकली नाही.
बातम्या आणखी आहेत...