मुंबई - तासगाव-कवठे महांकाळ व वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा गुरुवारी थंडावल्या. या दोन्ही मतदार संघात शनिवारी मतदान होणार असून, बुधवारी मतमोजणी आहे. तासगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुमनताई आर. पाटील व अपक्ष उमेदवार स्वप्निल पाटील यांच्यात लढत होत आहे. तर वांद्रे मतदार संघात शिवसेनेच्या तृप्ती सावंत, काँग्रेसचे नारायण राणे व एमआयएमचे रहेबार खान यांच्यात चुरस रंगणार आहे.