आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Assembly Election Modi Campaign At Mumbai

मुंबई, महाराष्ट्र थांबला तर देश थांबेल, विकास थांबेल- नरेंद्र मोदींची मुंबईत हाक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई व महाराष्ट्र थांबला, या प्रदेशाचा विकास थांबला तर देश थांबेल व देशाचा विकासही थांबेल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत केले. मुंबईतील घाटकोपर परिसरातील सौमय्या मैदानावर राम कदम, प्रकाश मेहता यांच्यासह त्या परिसरातील भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेत मोदी बोलत होते. यावेळी मोदींनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका करतानाच शरद पवारांवर हल्लाबोल केला.
मुंबईतील सौमय्या मैदानावर मोदी काय-काय म्हणाले... वाचा...
- सभेतील गर्दी पाहून मला पूर्ण बहुमत हवे असल्याची मतदारांना मोदींची साद
- ही गर्दी पाहून मला प्रचंड विश्वास वाटत आहे.
- मला विरोधकांत आक्रोश दिसत आहे.
- शिवछत्रपती सर्वांचेच आहेत, युगायुगाचे ते राजे आहेत
- शरद पवारांना छत्रपतींचे एवढे प्रेम होते तर अद्याप स्मारक का बांधले नाही
- निवडणुकीत पवारांना छत्रपतींची आठवण येते का?
- बाबासाहेबांचे स्मारक न होणे दुर्देवी
- जुनी राजकीय समीकरणे आता बदलली
- शरद पवार, व्होट बॅंकेचे राजकारण करू नका
- 15 वर्षाचे पाप धुण्याची सर्वोत्तम संधी
- मुंबई, महाराष्ट्राशिवाय देशाचा विकास नाही
- देशातील 500 शहरांचा विकास करण्याचा माझा संकल्प
- स्वच्छ शहरांसाठी आग्रही