आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गद्दार राष्ट्रवादी, मुर्दाड शिवसेना!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गद्दार राष्ट्रवादी व मुर्दाड शिवसेना.. अशा आरोप प्रत्यारोपाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला. रविवारी डोंबिवलीत झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर गद्दारांचे नेते अशी टीका केल्याने संतापलेल्या राष्ट्रवादीने सोमवारी शिवसेनेला मुर्दाडांचा पक्ष म्हणून हिणवले आणि त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाव मलिक यांच्यावर संतापाची आग ओतली.

‘शरद पवारांनी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला होता. एवढेच नाही तर काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबतही ते असेच वागले होते’, असा जोरदार टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. सोमवारी अधिवेशन सुरू झाल्यानंतर नबाव मलिक यांनी माध्यमांसमोर रविवारच्या टीकेची परतफेड केली.

हत्याकांड विसरले आठवले
नवाब मलिक म्हणाले, शिवसेना हा मुर्दाडांचा पक्ष असून उद्धव ठाकरे हे मुर्दाडांचे नेते आहेत. गोवारी हत्याकांड राष्ट्रवादी विसरलेली नाही. पण, या सभेत उद्धव यांच्या बाजूला बसलेले आरपीआयचे नेते रामदास आठवले रमाबाई नगरमधील हत्याकांड विसरले आहेत. मात्र महाराष्ट्राची जनता याची आठवण ठेवून अशा लोकांना त्यांची जागा दाखवून देईल.

‘शिवसेना आग आहे’
मलिक यांच्या टीकेनंतर संतापलेल्या शिवसेनेच्या आमदारांनी विधिमंडळाबाहेर मलिक यांच्या नावाने शिमगा केला.
ठाण्याचे आमदार एकनाथ शिंदे म्हणाले, ‘राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची लायकी काय आहे ते सर्वांनाच माहित आहे. आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्यामुळे ते निराश झाले असून प्रसिद्धी मिळवण्यासाठी ते आता विरोधकांवर टीका करण्याचा आटापीटा करत आहेत. मात्र त्यांनी एक लक्षात ठेवावे की शिवसेना ही आग असून आमच्या नादी लागाल तर खाक व्हाल. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता भ्रष्ट राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.’