आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरवणी मागण्यांचा घटनात्मक पेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेल्या हिवाळी अधिवेशनानंतरच्या काळात राज्य सरकारने केलेल्या खर्चाबाबतच्या पुरवणी मागण्या सोमवारी वित्त राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी विधानसभेत मांडल्या. मात्र त्यासोबत वित्तीय विवरणपत्र सादर न केल्यामुळे विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे, शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई आणि देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला.

घटनात्मक तरतुदीनुसार, सरकारतर्फे मांडण्यात येणार्‍या पुरवणी मागण्याही अंदाजपत्रकाप्रमाणेच असतात. त्यामुळे ज्याप्रमाणे अंदाजपत्रकाबरोबर वित्तीय विवरणपत्र सादर केले जाते, त्याप्रमाणेच पुरवणी मागण्यांच्यावेळीही सादर करण्याची मागणी शिवसेना- भाजपच्या आमदारांनी केली.

या मुद्दय़ावरून झालेल्या गोंधळात सभागृहाचे कामकाज तीनदा तहकूब करण्यात आले. सरकारतर्फे विरोधकांच्या आक्षेपांना उत्तर देण्याचा प्रयत्न झाला. त्यावर ‘विवरण पत्र सादर न करण्याची कारणे राज्यपालांना कळवण्यात आली असून या मुद्दय़ावर राज्यपालांचे मत येईपर्यंत हा निर्णय मी राखून ठेवतो,’ अशी हमी अध्यक्षांनी दिल्यानंतर कामकाज पुन्हा सुरू झाले. अखेर तांत्रिकदृष््ट्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर झाल्या.