आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधिमंडळ व मंत्रिमंडळ बैठकीत पुन्हा घोषणांचा पाऊस!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील आघाडी सरकारने लोकप्रिय घोषणांचा वर्षाव करणे सुरूच ठेवले. बुधवारी विधिमंडळ व मंत्रिमंडळ बैठकीत पुन्हा त्याची प्रचिती आली.

आयुर्वेदिक डॉक्टरांना अँलोपॅथीची परवानगी
होमिओपॅथिक डॉक्टर्सप्रमाणे आयुर्वेदिक व युनानी पदवी घेतलेल्या डॉक्टर्सना अँलोपॅथी प्रॅक्टिसला परवानगी देण्याचा महत्त्वूपर्ण निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाने घेतला. आयुर्वेदिक, युनानी वैद्यकिय अभ्यासक्रमात अँलोपॅथिक अभ्यासाचा समावेश होता. तरीही या दोन्ही डॉक्टर्सना अँलोपॅथिकची परवानगी नव्हती. या निर्णयाला अजित पवार, आर.आर. पाटील, जयंत पाटील यांनी विरोध केला. मात्र तरीही मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला. तसेच मुंबईसाठी ‘मेट्रो 3’लाही मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला. तब्बल 23 हजार कोटींचा या प्रकल्पामुळे मुंबईकरांचा प्रवास अतिशय सुखकर होईल. तसेच मुंबईकरांतील 2000 पर्यंतच्या झोपडपट्टय़ा नियमित करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

सर्वांना मोफत औषधी
सर्वच आरोग्य केंद्र व सरकारी रुग्णालयांत मोफत औषधी, वैद्यकीय साहित्य मिळेल. यासाठी उत्पन्नाची र्मयादा नसल्याने सर्वांनाच त्याचा लाभ मिळणार आहे

सोयगाव, फुलंब्रीसह 138 नगर पंचायती
गावांचा सुनियोजित पद्धतीने विकास व्हावा म्हणून राज्यातील 138 तालुक्यांना यापुढे सरसकट नगर पंचायत, नगर परिषदांचा दर्जा देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी बुधवारी विधानसभेत केली. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव, फुलंब्री येथे नगर पंचायती स्थापन होणार आहेत. हे निर्णय 1 मार्चपासून लागू होतील. याआधी 25 हजारांवर लोकसंख्या आणि शेती व्यतिरिक्त 35 टक्क्यांवर रोजगार असलेल्या गावांना नगर परिषदेचा दर्जा दिला जात होता. मात्र झपाट्याने होणारे नागरीकरण पाहता तालुक्याच्या गावांना हा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार विकास योजनेप्रमाणे रुग्णालये, शाळा, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन या सुविधा येथे पुरवण्यात येणार आहेत.

20 कोटींपर्यंत खर्चाचे राज्यातील रस्ते टोलमुक्त
राज्यातील 20 कोटी रुपयांपर्यंतच खर्चाचे रस्ते टोलमुक्त करण्याची घोषणा बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात केली. मराठवाडा- विदर्भाला जोडणार्‍या औरंगाबाद- नागपूर महामार्गाचाही यात समावेश असेल.

अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना पवार म्हणाले की, ‘एसटीला टोलमधून वगळण्याची भूमिका यापूर्वीच घेतली आहे. कृषी पंपांना रात्री वीज पुरवठा करण्याऐवजी सकाळी 8 पासून करण्यात यावा, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली होती. त्यावर सकारात्मक विचार करू, असे आश्वासन पवारांनी दिले.