आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांचा सभात्यागाने निषेध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अधिकृत झोपड्या खरेदी करणार्‍यालाही झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत घर देण्याची तसेच मोफत औषधांची योजना जाहीर करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचा बुधवारी विधान परिषदेत विरोधकांनी निषेध करत सभात्याग केला. अर्थसंकल्पात उल्लेख न करताच या योजनांची घोषणा कशी केली, असा आरोप त्यांनी केला. अंतरिम अर्थसंकल्पावरील चर्चेला अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक उत्तर देण्याच्या तयारीत असताना मुख्यमंत्र्यांनी झोपडीधारकांच्या हिताचा, 138 गा्रमपंचायतीचे नगर परिषदेत रुपांतर तसेच सरकारी रुग्णालयांमधून मोफत औषधे देण्याची घोषणा केली. या निवेदनानंतर विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी या घोषणा अर्थसंकल्पात का केल्या नाहीत, याचे उत्तर द्यावे अशी मागणी केली; पण मुख्यमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत आणि काढता पाय घेतला.

तेव्हा विरोधी पक्षांचे सदस्य आक्रमक झाले आणि घोषणा देत ते सभापतींच्या आसनासमोरच्या आसनासमोर गेले. इतक्यात मूळक यांनी आपल्या निवेदनाला सुरूवात केली. त्यानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला.विरोधकांच्या अनुपस्थितीत मूळक यांनी अतिवृष्टी, दुष्काळपीडितांप्रमाणे गारपीटीने संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांनाही मदत केली जाईल, असे आश्वासन दिले.

वीज ग्राहकांसाठी नऊ हजार कोटी, उद्योगांसाठी अडीच हजार कोटी, अंगणवाडी सेविकांसाठी 200 कोटी, एस. टी. महामंडळासाठी दीड हजार कोटी, अन्नसुरक्षा योजनेसाठी 330 कोटी आणि भांडवली खचार्पोटी 1440 कोटी रुपयांची तरतूद केल्यामुळे अंतरीम अंदाजपत्रक पाच हजार कोटींच्या तुटीत गेल्याचा दावा त्यांनी केला. विरोधकांना अंतरीम अर्थसंकल्पात उणीव काढण्यासारखे काही राहिलेले नाही. त्यामुळेच विरोधक उत्तर ऐकण्याच्या मनस्थीत नाहीत, म्हणून त्यांनी सभात्याग केल्याचा पलटवारही राजेंद्र मुळक यांनी आपल्या चर्चेच्या भाषणात केला.