आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra ATS Arrested 2011 Mumbai Blast Accused IM Terrorist Zainul Abedin.

2011 बॉम्बस्फोट: \'IM\'चा हस्तक झैनुल अबेदिनला मुंबई विमानतळावर अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- इंडियन मुजाहिद्दीनचा हस्तक व संशयित दहशतवादी झैनुल अबेदिन याला आज महाराष्ट्र एटीएसने मुंबई विमानतळावर अटक केली. अबेदिन महाराष्ट्र एटीएसला मुंबईत 2011 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी हवा होता. 13 जुलै 2011 रोजी झवेरी बाजार येथे झालेले बॉम्बस्फोट घडवून आणण्यास मदत केल्याचा अबेदिनवर आरोप आहे. पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी रियाज भटकल याने भारतीय तपास यंत्रणांना झवेरी बझार स्फोटात त्याचा हात असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून महाराष्ट्र एटीएस त्याच्या मागावर होती.
13 जुलै रोजी सायंकाळी झवेरी बाझार, ऑपेरा हाऊस आणि दादरचा कबुतरखाना या तीन ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्यात आले होते. या स्फोटप्रकरणी महाराष्टर् एटीएसला झैनुल अबेदिन हवा होता. या बॉम्बस्फोटात 17 ठार तर 102 नागरिक जखमी झाले होते.
भटकळचा आहे रहिवासी
- अबेदिन हा कर्नाटकमधील भटकळचा रहिवासी आहे.
- गुजरात, महाराष्ट्र पोलिस आणि कर्नाटक पोलिसांना विविध गुन्ह्यांसाठी अबेदिन हवा होता.
- अबेदिनचे नाव कर्नाटक, जयपूर, अहमदाबाद आणि मुंबई आदी स्फोटात घेतले गेले आहे.
- बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी एक्सप्लोसिव मटेरियल पोहचवण्याची जबाबदारी अबेदिनवर असायची.