आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Ats Report On Political Leaders Security

प्रचारसभादरम्यान अनेक बड्या नेत्यांच्या जिवाला धोका- \'ATS\'चा अहवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकसभेच्या निवडणूका जवळ आल्या असून, राजकीय नेत्यांच्या जीवांना प्रचारसभेदरम्यान धोका पोहचू शकतो असा अहवाल महाराष्ट्र एटीएसने दिला आहे. निवडणुकीच्या दरम्यान जाहीर प्रचारसभा होतात. काही नेते जनतेत मिसळण्याचा प्रयत्न करतात. मात्र हीच संधी साधून काही लोक नेत्यांच्या जीवांना धोका पोहचवू शकतात. त्यामुळे प्रचाराच्या काळात सुरक्षा कडे मोडून जनतेत मिसळण्याचे टाळले पाहिजे असे अहवालात म्हटले आहे. याबाबत एटीएसने महाराष्ट्र पोलिसांना सूचना दिल्या आहेत.
निवडणूक काळात काही नेते सभेच्या ठिकाणी जनसमुदायात जाण्याचा प्रयत्न करतात. याचबरोबर रोड शोच्या माध्यमातून नेते जनतेला अभिवादन करतात व हस्तांदोलन करतात. मात्र आता ते धोकादायक ठरू शकते अशी शक्यता दहशतवादविरोधी पथक (एटीएस)ने म्हटले आहे.
सोनिया गांधी, राहुल गांधी, पृथ्वीराज चव्हाण, आर. आर. पाटील, सुशीलकुमार शिंदे, शरद पवार आदी नेते समाजकटंक व दहशतवाद्याच्या रडारवर आहेत. निवडणूकीच्या काळातच नेहमीच राजकीय नेत्यांना धोका होण्याची शक्यता असते. मात्र त्या-त्या काळातील परिस्थितीनुसार धोका उत्पन्न होतो. राज्याचे गृहमंत्री आर आर हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर आहेत. सुशीलकुमार शिंदे हे दहशवादी व नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. शिंदे यांच्या गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळात अजमल कसाब व अफजल गुरु यांना फाशी दिल्याने मुस्लिम संघटनाचे दहशतवादी त्यांना लक्ष्य करू शकतात असे म्हटले आहे.
पुढे वाचा, पोलिस काय करणार उपाययोजना...