आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा मार्ग मोकळा, याचिकाकर्त्यांना 10 हजार रुपये दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना ‘महाराष्ट्र भूषण’ देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण देण्यास अाक्षेप घेणारी जनहित याचिका बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने अर्थहिन असल्याचे सांगत फेटाळली. यामुळे बुधवारी सायंकाळी पाच वाजता राजभवनात होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यावरील काळे ढग दूर झाले आहे.

बुधवारी सकाळी न्या. नरेश पाटील आणि न्या. एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. जवळपास दोन तास चाललेल्या युक्तीवादानंतर कोर्टाने ही याचिका पब्लिसिटी स्टंट असल्याचे सांगत फेटाळली आहे. कोर्टाच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागून राहिले होते. दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलिसांनी धरपकड सुरु केली आहे. पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण देण्यास विरोध करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आजचा दिवस हा 'काळा दिवस' असल्याचे म्हटले आहे. (सविस्तर वाचा पुढील स्लाइडवर)

कोर्टात काय झाले
पुरस्काराबाबत 1 सप्टेंबर 2012 च्या अध्यादेशाचे पालन करण्यात आले नाही, असा आरोप करण्यात आला होता. पुरस्कार जाहीर झालेल्या व्यक्तीने ती कार्यरत असलेल्या क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने किमान 20 वर्षे विशेष आणि उल्लेखनीय काम करणे बंधनकारक आहे. महाराष्ट्राबाहेरील व्यक्तीलाही पुरस्कार देता यावा यासाठी त्या व्यक्तीचे महाराष्ट्रात किमान 15 वर्षे वास्तव्य असावे अशी अट ठेवण्यात आली आहे. 'पद्म' पुरस्कारप्राप्त मान्यवरांना त्यात प्राधान्य देण्याचाही निकष आहे, परंतु बाबासाहेब यापैकी एकाही निकषात बसत नाहीत, असा दावा याचिकाकर्ते पद्माकर कांबळे आणि राहुल पोकळे यांनी केला होता. तो कोर्टाने फेटाळून लावला. बाबासाहेब पुरंदरे यांचे कार्य फार मोठे आहे. त्यांना पुरस्कार नाकारावा असे याचिकाकर्त्यांकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत, त्यामुळे याचिकेत तथ्य नाही, असे सांगत कोर्टाने याचिका फेटाळली आणि कोर्टाचा वेळ नाहक वाया घालवला असेही याचिकाकर्त्यांना फटकारले. कोर्टाने याचिकाकर्त्यांना 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला.
पुरंदरेंच्या वतीने ज्येष्ठ वकील उदय वारुंजीकर यांनी युक्तीवाद केला. तर शेखर जगताप हे याचिकाकर्त्यांचे वकील होते. महाराष्ट्र सरकारच्या वतीने अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला. त्यांनी सुरुवातीपासून याचिका पब्लिसिटी स्टंट असल्याची भूमिका घेतली होती.
मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घेण्याची गरज - अॅड. प्रकाश आंबेडकर
दरम्यान, भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र भूषणच्या वादात कोर्टाने पडून आपली प्रतिमी कमी करु नये असे म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या वादात ठोस भूमिका घेण्याची गरज असल्याचेही अॅड. आंबेडकर म्हणाले.

पुढील स्लाइडमध्ये, खासदार सुप्रिया सुळे यांनी बाबासाहेब पुरंदरेंचे अभिनंदन केलेले पत्र