मुंबई- ‘सुरुवातीला मी सरळ, साध्या पद्धतीने इतिहास लिहिला होता, पण तो वाचकांना भावला नाही. इतिहास संदर्भग्रंथाबरोबरच कलेच्या, पंडिती लेखनाच्या माध्यमातूनही आला पाहिजे. पण ललित वाङ्मय जेव्हा इतिहास बनतो, तेव्हा त्यात चूक होता कामा नये. अस्सल नोंदींचा, कागदपत्रांचा अभ्यास झाला पाहिजे. त्याचे विवेचनही झाले पाहिजे, असे प्रतिपादन प्रख्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बुधवारी केले.
राज्य सरकारतर्फे पुरंदरे यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते राजभवनात ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना पुरंदरे बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ‘महाराष्ट्र भूषण’ विजेते मंगेश पाडगावकर, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे , परिवहनमंत्री दिवाकर रावते, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, राज्यमंत्री विजय शिवतरे, विद्या ठाकूर, खासदार अरविंद सावंत, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, पुरस्कार निवड समितीचे सदस्य वासुदेव कामत, मंगला कांबळे आणि दिलीप वेंगसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
९३ वर्षांचे बाबासाहेब ओघवत्या शैलीत बोलत होते आणि राजभवनातील दरबार हॉलमध्ये बसलेले सर्व मान्यवर कानात प्राण ओतून ऐकत होते. बाबासाहेब म्हणाले, ‘आयाबहिणींच्या गर्भापर्यंत शिवचरित्र पोहोचवण्याचं माझं स्वप्नं होतं. येथे मला ज्ञानेश्वरांची आठवण झाली. तेराव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी भगवद्गगीता सोप्या मराठीत आणली. मी संजीवन समाधीसमोर गेलो आणि काना, मात्रा, वेलांटीचं कर्ज मागितलं. पोवाडा अधिक अपील होतो, म्हणून मी ती शैली निवडली. नाहीतर शिवचरित्र एक जड वस्तू झाली असती. मी लिहिलेलं शिवचरित्रं तुम्हाला आवडलं, हे मी माझं भाग्य समजतो. त्याचा मला आनंद आहे आणि मी समाधानीही आहे. संदर्भग्रंथ फक्त विद्वान वाचतात. तेच त्याचं महत्त्व जाणतात. लोकमान्य टिळकांचं ‘गीतारहस्य’ किती लोक वाचतात? पण, विनोबांची गीताई अधिक वाचली जाते. कारण ती लोकांना कळेल अशा भाषेत आहे, असा उल्लेखही त्यांनी केला.
इतिहास मोठं मौलिक धन आहे. ती सरस्वती आहे, लक्ष्मी आहे. त्याचा अपमान कदापि होता कामा नये. म्हणून शास्त्रशुद्ध इतिहासाबरोबरच ललित इतिहासही लिहिला पाहिजे. आजच्या हिंदवी स्वराज्यात वाडे, किल्ले, मशिदी, दर्गे आहेत. ती आपली समर्थ पर्यटनस्थळे व्हायला हवीत. रोहणखेड येथे औरंगजेबाच्या कन्येने बांधलेली मशीद जरूर बघायला जा, असे आवाहनही त्यांनी केले.
गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, राज्यमंत्री विजय शिवतरे, विद्या ठाकूर, खासदार अरविंद सावंत, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, पुरस्कार निवड समितीचे सदस्य वासुदेव कामत, मंगला कांबळे आणि दिलीप वेंगसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
मनोगत व्यक्त करताना बाबासाहेब म्हणाले, ‘आयाबहिणींच्या गर्भापर्यंत शिवचरित्र पोहोचवण्याचं माझं स्वप्नं होतं. येथे मला ज्ञानेश्वरांची आठवण झाली. तेराव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता सोप्या मराठीत आणली. मी संजीवन समाधीसमोर गेलो आणि काना, मात्रा, वेलांटीचं कर्ज मागितलं. पोवाडा अधिक अपील होतो म्हणून मी ती शैली निवडली. नाहीतर शिवचरित्र एक जड वस्तू झाली असती. मी लिहिलेलं शिवचरित्रं तुम्हाला आवडलं, हे मी माझं भाग्य समजतो. त्याचा मला आनंद आहे आणि मी समाधानीही आहे. संदर्भग्रंथ फक्त विद्वान वाचतात. तेच त्याचं महत्त्व जाणतात. लोकमान्य टिळकांचं ‘गीतारहस्य’ किती लोक वाचतात? पण विनोबांची गीताई अधिक वाचली जाते. कारण ती लोकांना कळेल अशा भाषेत आहे, असा उल्लेखही त्यांनी केला.
शिवछत्रपती थीम पार्कचं स्वप्न :
माझं एक अपुरं स्वप्न आहे. तंजावरच्या श्रीमंत छत्रपती सरफोजी राजेंनी तिथे सरस्वती महालासारखं जे समृद्ध ग्रंथालय उभारले आहे, तसंच ग्रंथालय आणि संग्रहालय, अर्थातच शिवचरित्र आणि इतिहासाशी संबंधित असं थीम पार्क इथं महाराष्ट्रात उभ करावे असे माझं स्वप्न आहे. त्यासाठी पुण्यात, लोणावळा आणि मालवणमध्ये काम चालू आहे. कागदपत्रे मिळवण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
हायकोर्टाने याचिका फेटाळली
पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण' देऊ नये यासाठी दाखल याचिका उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. तसेच निष्कारण वेळ घेतल्याबाबत याचिकाकर्त्यांना १० हजार रुपयांचा दंडही ठोठावला.
स्वत:चे १५ लाख टाकून कॅन्सर ग्रस्तांना २५ लाख
मला रुपया नेहमी गाडीच्या चाकासारखा वाटत आला आहे. त्यामुळे पुरस्काराच्या १० लाखांच्या रकमेत माझे १५ लाख रुपये टाकून एकूण २५ लाखांची रक्कम कॅन्सरग्रस्तांच्या उपचारासाठी पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयास देणार आहे, अशी घोषणा पुरंदरे यांनी केली
मराठवाड्याला मदत द्या
महाराष्ट्रातील दुष्काळाला आपण सर्वांनी मिळून सामोरे जायला हवे. मराठवाड्याला दुष्काळाची सर्वाधिक झळ पोहोचलेली आहे. त्यासाठी मी, माझे सहकारी कुवतीनुसार मदत करणार आहोत. तेथील बांधवांना पुन्हा आनंदी झालेलं पाहण्यास आम्ही उत्सुक आहोत, अशी भावनाही पुरंदरे यांनी व्यक्त केली.
पुढील स्लाइडवर वाचा, सोहळ्याला अनेक दिग्गज अनुपस्थित...