आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Bjp Demands Sit Probe Against Bhujbal, Tatkare ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुजबळांची चौकशी करा; सोमय्या यांची राज्यपालांकडे मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बोगस कागदपत्रांच्या आधारे विविध कंपन्या स्थापन करून कोट्यवधींचा भ्रष्टाचार करणा-या सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्या भ्रष्टाचाराची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय सचिव किरीट सोमय्या यांनी शनिवारी राज्यपालांकडे केली.
किरीट सोमय्या यांच्या अध्यक्षतेखालील एका शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. आमदार योगेश सागर आणि आमदार आशिष शेलारही या वेळी उपस्थित होते. तसेच या दोन मंत्र्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्याची परवानगी द्यावी आणि अंधेरीच्या आरटीओ प्रकल्पाच्या एसआरएला स्थगिती द्यावी, अशी मागणीही केल्याचे त्यांनी सांगितले. छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून बोगस कागदपत्रांच्या आधारे कंपन्या स्थापन करून त्याद्वारे कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला असून त्यासंदर्भातील पुरावे राज्यपालांना दिल्याचे सोमय्या यांनी सांगितले.