आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील 11 हजार गावे दुष्काळमुक्त, सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध- राज्यपाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सरकारने गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत राबवलेल्या महत्त्वपूर्ण योजनांचा आढावा घेतला. राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेतंर्गत राज्यातील 11 हजार गावे दुष्काळमुक्त झाल्याचा दावा राज्यपालांनी केला आहे. मागेल त्याला तळे या योजना सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांना मिळाला. मागील सहा महिन्यांत राज्याच्या गुंतवणुकीत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. औद्योगिक विकासाच्या देशपातळीवर महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा अग्रेसर ठरल्याचे राज्यपालांनी सांगितले.

दरम्यान, अधिवशेनाच्या पहिल्या दिवशीच विरोधकांनी अपेक्षेप्रमाणे सरकारविरोधात घोषणाबाजी केली. राज्यपालांचे अभिभाषण सुरु असतानाच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून घेरण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्रातही शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी राज्याच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीस सरकारवर दबाव आणू, अशी भू्मिका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश निवडणूक प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्यांची रविवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना राधाकृष्ण  पाटलांनी शेतकऱ्यांना  कर्जमाफी हाच आमचा प्रमुख िवषय असल्याचे  स्पष्ट केले.    

महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या मंत्र्यांना अचानक शेतकऱ्यांचा कळवळा आला आणि त्यांनी कर्जमाफीची मागणी केली. मात्र, हे शिवसेनेचे वरवरचे प्रेम आहे. मराठवाड्यात मागील दोन महिन्यांत १७० शेतकऱ्यांनी आत्महत्या  केल्या असून सर्वाेच्च न्यायालयानेही  शेतकरी आत्महत्यांवरून  सरकारला फटकारले आहे. यामुळे हीच कर्जमाफीची योग्य वेळ असून मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी आता पंचांग काढून मुहूर्त शोधण्याचे  नाटक करू नये. नाहीतर भाजपच्या कुंडलीत देश सोडून पळून गेलेल्या मल्ल्याची  पाठराखण करण्याचा योग होता, असे लोक बोलतील, असा टोलाही विखेंनी या वेळी  मारला.    

मुंबई महानगरपालिकेतील महापौर निवडणुकीच्या नाट्यावरून भाजप व शिवसेनेचा चेहरा खरा चेहरा राज्यातील जनतेसमोर आला. या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला कौरव असल्याचा आरोप करताना पारदर्शक कारभाराचा आव आणून स्वत:ला पांडव म्हटले होते. पण महापौरपदाच्या  भाजपने माघार घेतल्याने शिवसेनेप्रमाणेच फडणवीसांचा पक्षही काैरव असल्याचे दिसून आले. हे दोन्ही पक्ष दुर्योधन व दु:शासन आहेत. हे दोघेही छत्रपती िशवाजी महाराजांचे नाव घेतात खरे, पण आज महाराज असते तर भाजप-िशवसेनेचा टकमक टोकावरून कडेलोट केला असता, अशी टीका विखेंनी केली. निवडणुकांच्या प्रचारसभेत फडणवीस यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली. पण आता महापौरपदाच्या निवडणुकीत त्यांच्यावरोधात लढण्याऐवजी  सेनेशी भाजपने मांडवली केली. आरोप केल्यावर विरोध करणे गरजेचे असताना फडणवीसांनी निवडणुकीतून पळ काढला. हा प्रकार म्हणजे माफियाराजचे  समर्थन असून राज्यातील जनतेची पारदर्शक फसवणूक आहे याकडे विखे यांनी लक्ष वेधले.    

डू यू रिमेंबर : धनंजय मुंडे    
मुंबई महापालिका निवडणुकांच्या प्रचारसभेत शिवसेनेच्या ‘डिड यू नो’ला भाजपने ‘डू यू नो’ असे प्रत्युत्तर दिले होते. मात्र आता महापौरपदाच्या निवडणुकीत माघार घेऊन भाजपने शिवसेनेला अप्रत्यक्षरीत्या  मदत केल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावरून दोन्ही पक्षांचा ‘डू यू रिमेंबर’ असे सांगत जोरदार समाचार घेतला. भाजपबरोबरच्या  युतीमुळे सेनेची २५ वर्षे सडली, भाजप हा गुंडांचा पक्ष आहे, असे शिवसेनेने आरोप केले होते. भाजपनेही पलटवार करताना सेना हा माफियांचा पक्ष असून भगवा हाती घेऊन हप्ते वसूल करणारी टोळी असल्याचे म्हटले होते. यामुळे आता आम्ही दोघांनाही ‘डू यू रिमेंबर’ असे विचारत आरोपांचे काय झाले, असा प्रश्न करणार असल्याचे मुंडे म्हणाले. 

चहापानावर बहिष्कार    
राज्य सरकार शेतकरी आत्महत्या रोखण्यात अपयशी तर ठरले आहेच, पण राज्यातील गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. असे असताना अधिवेशन आहे म्हणून सरकारचे चहापान घेण्यात  पक्षांना अजिबात रस नाही. यामुळेच  सरकारच्या चहापानावर आम्ही बहिष्कार घालत आहोत. विरोधकांची ताकद आम्ही अधिवेशनात दाखवून देऊ, असा आक्रमक पवित्रा विखे पाटील व मुंडे यांनी घेतला.    

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...