आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

EBC उत्पन्न मर्यादा 6 लाख; उच्च शिक्षणाचे प्रवेश शुल्क निम्मे; ६०% गुण असणेही अावश्यक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फाइल फोटो) - Divya Marathi
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फाइल फोटो)
मुंबई - राज्यात काढल्या जात असलेल्या मराठा मोर्चांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गुरुवारी मोठा निर्णय घेतला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठीच्या शैक्षणिक सवलती आता वार्षिक ६ लाख उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलांनाही मिळतील. यासाठी राज्य शासनाने राजर्षी शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजना मंजूर केली.

गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत मजुरांच्या मुलांसाठी व्यावसायिक शिक्षणाची साेय व्हावी म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनाही जाहीर करण्यात आली.

याशिवाय शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना जाहीर करण्यात आली असून यात २०१६-१७ पासून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या काळात भोजन, निवास आणि शैक्षणिक साहित्यासाठी थेट मदत मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
पुढील स्लाइडमध्ये वाचा,
> कोणकोणत्या योजना जाहीर केल्या...
> नव्या योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर पडणार ८०० कोटी रुपयांचा भार
बातम्या आणखी आहेत...