आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Cabinet Meeting Latest News In Marathi

कॅबिनेटमध्ये चर्चा : तंटामुक्तच्या धर्तीवर आता दलित अत्याचारमुक्त गाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पुरोगामी म्हणवल्या जाणार्‍या महाराष्ट्रात दलितांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दलित मतांवर डोळा ठेवत राज्य सरकारने हे अत्याचार रोखण्यासाठी पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. त्यानुसार तंटामुक्त गाव योजनेच्या धर्तीवर दलित अत्याचारमुक्त गाव अशी योजना राबवली जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत हा विषय चर्चेला आला.
सामाजिक न्याय, गृह, ग्रामविकास विभागातील अधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन हे अत्याचार रोखण्यासाठी काय करता येईल याचा अभ्यास करावा, अशा सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्या. अत्याचारमुक्त गाव योजना राबवण्यासाठी एक कार्यक्रम तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे समजते.
जिल्हानिहाय घटना : 0नगर 95 0पुणे 134 0सोलापूर 72 0सातारा 78 0सांगली 26 0यवतमाळ 88 0बीड 83 0जळगाव 78

वर्षभरातील घटना
0 नगरच्या खर्डा येथे सवर्ण मुलीशी बोलल्याने नितीन आगे या तरुणाची हत्या.
0 उस्मानाबादच्या उमरा येथे मतिमंद मुलीवर 62 वर्षीय सवर्णाचा बलात्कार.
0 वाशीममध्ये डॉ. आंबेडकर जयंती मिरवणुकीवरून तरुणांवर अत्याचार.
0 गतवर्षी नगरच्या नेवासे तालुक्यात प्रेमप्रकरणातून तीन दलित तरुणांची हत्या.
0 इंदापूर तालुक्यात चंद्रकांत गायकवाड नावाच्या दलित कार्यकर्त्याची हत्या.
बुलडाण्याचे उदाहरणही
दोन समाजांतील तेढ सामोपचाराने दूर करता येते हे अनुभवाने सांगू शकतो. बुलडाण्यातील बेलाड गावात लोकांना एकत्र बसवून दिलजमाई घडवून आणता आली, असे मंत्री राऊत यांनी सांगितले. दलितांनी झेंडा रोवल्याने येथे वाद उद्भवला होता.
मतांवर डोळा, म्हणूनच कळवळा
वाढत्या दलित अत्याचारांबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. रोहयोमंत्री नितीन राऊत यांनी त्यावर आवाज उठवला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या मुद्दय़ावर पावले उचलण्याची गरज असल्याचे म्हटले. बैठकीनंतर राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. वाढत्या घटनांमुळे मुख्यमंत्री चिंतित असून काय करता येईल यावर गांभीर्याने ते विचार करत आहेत, असे राऊत म्हणाले. एकंदर आगामी निवडणुका पाहूनच मंत्र्यांनी दलितांचा कळवळा व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.
अत्याचारमुक्तीवरून दोन मंत्र्यांतच ‘तंटा’
नितीन राऊत, रोहयोमंत्री
0 दलितांवर अत्याचार वाढले आहेत. पोलिस कारवाई करत नाहीत.
0 गेल्या वर्षभरात राज्यात दलित अत्याचाराच्या घटनांत 548 ने वाढ झाली आहे.
आर.आर. पाटील, गृहमंत्री
0 अत्याचार रोखण्यासाठी पोलिस योग्य ती कारवाई करत आहेत.
0 अन्य राज्यांच्या तुलनेत राज्यातील दलित अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण फक्त 6% आहे.

1634 दलितांवर अत्याचार गेल्या वर्षभरात
548 हा आकडा गतवर्षीपेक्षा वाढला आहे.