आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत 4 Octला हाेणार मंत्रिमंडळाची बैठक; पाणी व्यवस्थापन, रोजगार निर्मितीवर होणार चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्य मंत्रिमंडळाची पुढील बैठक औरंगाबाद येथे ४ ऑक्टोबरला होणार आहे. या निमित्ताने अवघे युती सरकारचे मंत्री मराठवाड्यात दाखल होणार असून बैठकीत मराठवाड्यातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पाण्याच्या व्यवस्थापनावर (वाॅटर ग्रीड) तसेच विकासाच्या दृष्टीने चर्चा होणार आहे. यात रोजगार निर्मितीचा समावेश असेल.

सत्तेत आल्यानंतर शिवसेना-भाजप सरकारची औरंगाबादेत होत असलेली ही पहिलीच बैठक आहे, अशी मािहती अर्थमंत्री सुधीर मुनगंटंीवार यांनी िदली. गेली चार वर्षे मराठवाड्याने दुष्काळाचे चटके सोसले असून पाण्यासाठी वणवण केली. मात्र, यंदा वरुणराजाने मराठवाड्यावर चांगलीच कृपा केली आहे. पावसामुळे मराठवाड्याची तहान भागविणारी बहुतांशी धरणे जवळपास भरली आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी गुजरातच्या धर्तीवर ‘वॉटर ग्रीड’ प्रकल्प राबविण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
वॉटर ग्रीडबाबतचा अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे. महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांना प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले आहे. या प्रकल्पाबाबत औरंगाबाद येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडे या बैठकीच्या नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.
पाण्याच्या व्यवस्थापनाबरोबर मराठवाड्यातील शेतीविषयीचे निर्णयही या बैठकीत घेण्यात येतील. शेतीबरोबरच रोजगार िनर्मिती झाल्यास या भागातील युवकांना आधार मिळेल आणि स्थलांतराचे प्रमाणही कमी होईल. यादृष्टीने बैठकीत महत्वाचे िनर्णय घेतले जातील, याकडे अर्थमंत्र्यांनी लक्ष वेधले.
बातम्या आणखी आहेत...