आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? फेरबदलाचे संकेत, अनेकांचे मंत्रिपद जाणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
मुंबई- केंद्रीय मंत्रीमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यातही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. अनेकांना मंत्रिपद गमवावे लागण्याची लागणार असून अनेक नव्या चेहऱ्यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप भाजपकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.
 
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास काहींची मंत्रिपदे जाणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. पावसाळी अधिवेशनात गृहनिर्माण मंत्र्यांवर आणि उद्योगमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले. विरोधकांच्या दबावामुळे मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मंत्र्यांच्या विरोधात लागलेल्या आरोपांच्या चौकशीचे आदेश दिले. दोन्ही मंत्र्यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली. पण मुख्यमंत्र्यांनी हे राजीनामे स्वीकारले नाहीत. त्यांनी चौकशी अहवाल आल्यानंतरच याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
 
केंद्रात दीड वर्षांनंतर होणारी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन फेरबदल होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वच्छ प्रतिमा लक्षात घेत त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. असे घडल्यास मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार कोण पाहणार हाच मोठा प्रश्न असेल. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा यासाठी विचार करण्यात येत आहे. त्यावेळी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी घेण्याच्या मुद्द्याचाही गांभीर्याने विचार करण्यात येत आहे.

पुढील स्लाइडवर वाचा... मुख्यमंत्रीपदासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नावे चर्चेत
 
 
बातम्या आणखी आहेत...